घरठाणेDombivli : खोणी पलावा परिसरातील बहुमजली इमारतीला भीषण आग; 6 मजले जळून...

Dombivli : खोणी पलावा परिसरातील बहुमजली इमारतीला भीषण आग; 6 मजले जळून राख

Subscribe

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीजवळ खोणी पलावा परिसरातील एका बहुमजली इमारतीला दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी हजर आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र आग एवढी भीषण होती इमारतीचे 6 मजले जळून खाक झाले आहेत. (Dombivli A multi storied building in Khoni Palava area was gutted by fire 6 floors burnt to ashes)

हेही वाचा – Ram Mandir : शंकराचार्यांवरील ‘त्या’ वक्तव्यानंतर नारायण राणे यांचे अवघ्या तासाभरात घुमजाव; म्हणाले…

- Advertisement -

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 11  व्या मजल्यावर आग लागली आणि ती 18 व्या मजल्यावर पसरली. इमारतीचे बांधकाम अजूनही सुरू असून सध्या फक्त पहिल्या तीन मजल्यापर्यंतच लोक राहत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु पाण्याच्या टँकरसह अग्निशमन दलाचे पथक त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली आहे. गृहसंकुलाच्या फेज 2च्या ई विंगमध्ये आग लागली असून आता कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून कारवाई सुरू आहे.

- Advertisement -

लोढाकडून निवेदन जारी

भारतीय बहुराष्ट्रीय रिअल इस्टेट कंपनी लोढा यांनी या प्रकरणी निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले की, आम्हाला याची माहिती मिळताच पलावा सिटी मॅनेजमेंट असोसिएशन (पीसीएमए) चे आपत्कालीन प्रतिसाद पथक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र इमारतीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : निमंत्रण मिळाले नसले तरी अयोध्येला नक्की जाणार, पण…; शरद पवारांचे मोठे भाष्य

वॉशिंग मशीनच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने लागली आग

पोलीस सूत्रांनी सांगितले की, इमारतीच्या एका मजल्यावरील घर मालक वॉशिंग मशीन बंद करण्यास विसरून गेले. त्यामुळे वॉशिंग मशीनच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला आणि आग लागली. खोणी पलावामधील आलोरिया या इमारतीत कबुतर जाऊ नयेत म्हणून प्लॅस्टिकच्या जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. या जाळीला वॉशिंग मशीनच्या कॉम्प्रेसरच्या आगीचा स्पर्श झाल्याने आग भडकली आणि आगीने रौद्र रूप धारण केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -