घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरे अस्तित्वहीन; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

उद्धव ठाकरे अस्तित्वहीन; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

Subscribe

शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे संपलेले आहेत. त्यांचे अस्तित्व उरलेले नाही. शिवाजीपार्कवर आता बोलण्यासारखे त्यांच्याकडे काय उरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे संपलेले आहेत. त्यांचे अस्तित्व उरलेले नाही. शिवाजीपार्कवर आता बोलण्यासारखे त्यांच्याकडे काय उरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे. खरे गद्दार उदधव ठाकरेच आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी येथे केली. (union minister narayan rane slams shiv sena leader uddhav thackeray)

मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणा-या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस या विशेष ट्रेनला राणे यांच्या हस्ते हिरवा दाखविण्‍यात आला. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राणे यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केले.

- Advertisement -

गणरायाच्या कृपेने महाविकास आघाडी सरकार गेले. आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे सरकार आले आहे. राज्य आता सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यांचे सरकार गेले आणि त्यांचा आवाज गेला. शिवसेनेकडे उद्धव ठाकरेंकडे आता आमदार तरी कुठे उरले आहेत.

एकनाथ शिंदेंकडे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. उरलेले पण आता त्यांच्याकडेच जातील. उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली आहे. ठाकरे यांनी भाजप तसेच कडवट शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदेंशी गद्दारी करून मुख्यमंत्रिपद मिळविले. जी काही कामे केली ती मातोश्री आणि नातेवाईक यांच्यासाठीच केली. मेट्रोचे काम त्यांनी बंद केले. विकास फक्त पैसे मिळविण्यासाठीच केला, असा आरोप राणे यांनी केला.

- Advertisement -

शिवसेनेची खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद हे गद्दारी करून मिळवलं असल्याचा हल्लाबोल राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं असल्याचे राणे यांनी म्हटले. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी जी कामं केली ती आपल्या निकटवर्तीयांसाठी केली असल्याचा आरोप राणे यांनी केला.


हेही वाचा – कांजूर कारशेड प्रकरणावर अखेर पडदा, ठाकरे सरकारचा आदेश शिंदे सरकारकडून मागे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -