घरताज्या घडामोडीमनसे सोबतच्या युतीचा निर्णय दिल्लीत होईल; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

मनसे सोबतच्या युतीचा निर्णय दिल्लीत होईल; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

Subscribe

युतीबाबत आमचे दिल्लीतील आणि राज्यातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, माझ्याकडे फक्त पक्षवाढीचं काम आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी येथे केले. शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे. उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी राहिले नाहीत.

युतीबाबत आमचे दिल्लीतील आणि राज्यातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, माझ्याकडे फक्त पक्षवाढीचं काम आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी येथे केले. शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे. उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी राहिले नाहीत. त्यांनी सगळं सोडून दिले आहे. कौटुंबिक प्रेमात ते सगळ्या गोष्टी विसरून गेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या कार्याला बगल देऊन ते आपलं काम करत आहेत. अशी टीकाही त्यांनी केली. (Alliance with MNS will be decided in Delhi Information about Chandrashekhar Bawankule)

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोघांची राजकीय विषयावर चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप आणि मनसेचे युती होण्याची दाट शक्यता आहे. राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीचा सिलसिला लक्षात घेतला तर ही युती आता औपचारिकता असल्याचे बोलले जाते आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी मनसे सोबतच्या युतीचा निर्णय दिल्लीतून होईल, असे स्पष्ट केले.

- Advertisement -

भाजप आणि मनसेच्या युतीबाबतचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नाडा द्रीय ग़हमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील. प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाला वाढविण्याचे काम मी करत आहे.संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेसोबत शिवसेना एका बाजूला युती करतेय तर दुसरीकडे हिंदुत्वाची भाषा करत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे. शिवसेना सध्या गडबडलेल्या अवस्थेत आहे. शिवसेना शरद पवार आणि काँग्रेससोबत जाते. नंतर आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवते. त्यामुळे मतदानाच्या वेळी जनताच काय ते ठरवेल, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

उद्धव ठाकरे तसेच शरद पवार राज्याचा दौरा करणार आहेत. याबद्दल विचारले असता, यापूर्वी शरद पवार यांनी अनेक वेळा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मात्र ६० आमदारांच्यावर ते कधी गेले नाहीत. आतापर्यंतचे त्यांचे राजकारण पाहिले असता जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा ते कोणाला तरी तोडूनच आले आहेत. अडीच वर्षे त्यांना फिरण्याची संधी होती मात्र ते फिरले नाहीत. आता फिरत आहेत. पक्ष वाढवायला त्यांना मनाई नाही. पण अडीच वर्षे ते कुठे होते?हा प्रश्न जनता त्यांना विचारणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – उद्धव ठाकरे अस्तित्वहीन; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -