घरमहाराष्ट्रराज्यात अवकाळी पावसाचे संकट; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला इशारा

राज्यात अवकाळी पावसाचे संकट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला इशारा

Subscribe

राज्यात आधीच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पण पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचे संकट येण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.

राज्यात आधीच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पण पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचे (Unseasonal rain crisis) संकट येण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच चिंतेची बाब म्हणजे काही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. यंदा राज्यात एप्रिल महिन्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यात काल मंगळवारी (ता. ०४ एप्रिल) ढगाळ हवामान होते.

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवसांमध्ये हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ येथे गुरुवारी वीजांच्या कडकाडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच, शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासोबतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही पाऊस पडू शकतो अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद येथे शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला.

राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांची दाणादाण उडाली आहे. त्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. तर त्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच आता पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. पश्चिमी प्रकोपाची स्थिती, विखंडीत वारे या प्रभावाखाली राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; सलग पाच दिवस पाऊस म्हणजे नैसर्गिक आपत्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -