घरमहाराष्ट्र'राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार'; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला टोला

‘राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार’; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला टोला

Subscribe

सातारा : “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार”, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि अजित पवार गटाला दिला आहे. भाजपने माझ्या कुटुंबावर हल्ला केला असून त्यांना शरद पवारांची भीती वाटते, असा टोला सुप्रिया सुळेंनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना लगावला.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्या ठिकाणी उमेदवार उभे असतील किंवा शरद पवार जरी स्वत: उभे राहिले, तरी त्यांना पाठिल्याशिवाय रहायचे नाही, असे वक्तव्य भाजपकडून केले जात आहे, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “या देशात एकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कश्मीर टू कन्याकुमारी, लहान मुला विचार किंवा जेष्ठ व्यक्तीला देखील प्रश्न विचारा तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार. हे तुम्ही कुठे आणि कोणालाही विचारा. त्यामुळे माझा गटावर विश्वास नाही”, असे स्पष्ट संकेत सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटासह भाजपला दिले आहेत.

- Advertisement -

भाजपविरोधात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” भाजपने आमच्या कुटुंबावर हल्ला केला. आमच्या पक्षावर रोज हल्ला करतात तरी त्यांना शरद पवारांची भीती का आहे?, काही झाले तरी दिवसभर ते शरद पवार बोलत असतात म्हणजे आमचे मार्केटमध्ये नाणे चालत असेल, यांचा अर्थ आहे.” दिंडोरी मंतदारसंघाचा शरद पवारांनी आढावा घेतला आहे. यामुळे शरद पवार लोकसभा निवडणूक लढणार का? अशा चर्चा रंगूल लागल्या आहे. या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “होय, यापूर्वीच त्यांनी सांगितले होते की, ते निवडूक लढणार नाही आणि अजून त्यांच्या राज्यसभेची तीन वर्ष आहेत.”

हेही वाचा – “बारामतीत माझ्याविरोधात कोणीही लढणार…”, सुप्रिया सुळेंची सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर प्रतिक्रिया

- Advertisement -

खोके सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही

एका मराठा आरक्षणाच्या मुद्यावर एका बांधवाने आत्महत्या केली, या प्रश्ना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अतिशय असंवेदनशील ट्रिपल इंजिन, खोके सरकार आहे. या सरकारला कोणत्याही आरक्षणाबद्दल गांभीर नाही. मी विरोधक म्हणून आरोप करत नाही. मी दिल्लीत ते काय बोलतात ते बघते आणि राज्यात काय बोलतात. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या चार समाजाच्या आरक्षणाचे गंभीर मुद्दे, चर्चा आणि मागण्या आहेत.”

हेही वाचा – मतांच्या राजकारणासाठी ‘ते’ दहशतवाद्यांचं समर्थन करतायेत; बावनकुळेंची शरद पवारांवर टीका

फडणवीस पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल्या, “आमच्या घराबाहेर 2013-14 मध्ये देवेंद्र फडणवीस आले होते आणि म्हटले होते की, पहिल्या कॅबिनटेमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देईल. संसदेत जेव्हा मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे आरक्षणाबद्दलचर्चा होते. तेव्हा या विषयावर सुचना देणारे खासदार मी आहे. या मुद्यावर जेव्हा भाजप आम्हाला उत्तर देते. तेव्हा भाजप हे धनगर समाजाच्या विरोधात आहेत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -