घरमहाराष्ट्रआयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी शोधले व्हेंटिलेशन हेल्मेट

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी शोधले व्हेंटिलेशन हेल्मेट

Subscribe

ट्राफिकमध्येही बाईक रायडिंग होणार कुल

दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र तरीही दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाहीत. त्याचे कारण म्हणजे हेल्मेट घातल्याने कमालीचे गरम होते. त्यातून आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी दिलासा देणारे संशोधन केले आहे. चक्क व्हेंटिलेशन असणारे हेल्मेट त्यांनी तयार केले आहे. हेल्मेटमध्ये हवा खेळती राहण्यासाठी विशिष्ट रचना असल्याने हे हेल्मेट घातल्यानंतर घाम येत नाही. काही कंपन्यांसोबत या हेल्मेटचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठीची चाचपणीही आयआयटी मुंबईकडून सुरू आहे.

सध्या भारतीय मार्केटमध्ये असणारे चिनी बनावटीचे हेल्मेट हे वजनाने जड असते. तसेच हेल्मेटच्या आत कुशनसाठी वापरण्यात आलेल्या मटेरिअलमुळे डोक्याला घाम येतो. त्यामुळेच अनेकांकडून हेल्मेट वापरण्यासाठी टाळाटाळ होत असते.

- Advertisement -

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी आपल्या हेल्मेटचे वजन कमी करण्यासाठी त्यात थर्माकॉलचा वापर केला आहे. डोक्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टीनेच थर्माकोलचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे डोके सुरक्षित राहतानाच आघाताचा धोकाही टळणे शक्य होईल. आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरच्या बी. के. चक्रवर्ती यांच्या निरीक्षणाअंतर्गत हेल्मेट तयार करण्यात आले आहे. या हेल्मेटचे प्रोटोटाईप मॉडेलही आयआयटीने तयार केले आहे.

व्हेंटिलेशन आणि एक्झिट
भारतातील विविध शहरातील तापमान आणि दुचाकीस्वारांची संख्या लक्षात घेऊनच आयआयटी मुंबईने हा प्रकल्प हाती घेतला. पारंपारिक हेल्मेटच्या तुलनेत उकाड्याच्या वातावरणातही या हेल्मेटला चांगल्या वेंटिलेशनची सुविधा देण्यात आली आहे. गाडी हळुवार वेगाने धावत असतानाही हेल्मेट जड वाटणार नाही अशा हलक्या स्वरूपाचे हेल्मेट तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेल्मेटमध्ये हवा खेळती रहावी म्हणून चांगल्या व्हेंटीलेशनचा पर्याय वापरण्यात आलेला आहे. हेल्मेटच्या पुढच्या बाजुनेच हेल्मेटला छोट्या आकाराचे होल करण्यात आले आहेत. तर हेल्मेटच्या मागील बाजूस या व्हेंटिलेशनचा एक्झिट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हेल्मेटमधून समोर आलेली हवा संपुर्ण हेल्मेटमध्ये खेळून मागच्या बाजुने बाहेर पडते. दुचाकीस्वारांच्या सोयीसाठी हनवटीची जागाही विशिष्ट पद्धतीने डिझाईन केली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -