घरमहाराष्ट्र'विहिंप'च्या प्रवीण तोगडियांचा नवा राजकीय पक्ष!

‘विहिंप’च्या प्रवीण तोगडियांचा नवा राजकीय पक्ष!

Subscribe

प्रवीण तोगडिया यांनी नव्याने स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचं नाव, 'आंतरराष्ट्रीय जनता पार्टी' असं आहे.

आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली असून, ‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’ असं त्याचं नाव आहे. भाजपवर नाराज असलेल्या तोडगियांनी पक्ष स्थापनेची घोषणा करतेवेळीच लोकसभा निवडणूका लढवणार असल्याचं घोषित केलं. याशिवाय आमचे सरकार निवडून येताच ३ महिन्यांमध्ये राम मंदिर बांधू, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. याआधीच त्यांनी भारतामध्ये हिंदू सरकार असावं असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे तोडगिया लवकरच राजकरणात उतरणार अशी शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता खरी ठरवत आज अयोध्या दौऱ्यावर असलेल्या तोडगियांनी ‘आंतराष्ट्रीय जनता पार्टी’ हा पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शेकडो कार्यकर्ते तिथे हजर होते. दरम्यान, यावेळी ‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार दिले जातील. याशिवाय सरकार येताच अल्पसंख्याकांची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठीही कायदा केला जाईल’, असं सांगत तोडगियांनी त्यांच्या नवीन पक्षात सामिल होण्याचं आवाहन हिंदू संघटनांना केलं.


वाचा: चक्क ‘मुहूर्त’ बघूनच चोरी करणारे दोन भामटे

दरम्यान, आज सकाळी हिंदू परिषदेच्या हजारो कार्यकर्त्यांनी रामकोट परिक्रमेसाठी कूच केल्यानंतर काही काळासाठी अयोध्येत तणाव निर्माण झाला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी अयोध्येकडे जाणाऱ्या बॅरिकेड्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि एएचपी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली. एकीकडे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे प्रवीण तोगडिया सेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. संजय राऊतांनी सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती आणि आता आज ते तोगडियांची भेट घेणार असल्यामुळे, या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


वाचा: ‘सीआयडी’ मालिकेसाठी चाहत्यांचं #SaveCID कॅम्पेन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -