घरमहाराष्ट्रजिल्ह्या परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा पाकिस्तानी विद्यार्थ्यांशी व्हिडिओ संवाद

जिल्ह्या परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा पाकिस्तानी विद्यार्थ्यांशी व्हिडिओ संवाद

Subscribe

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पाकिस्तान विद्यार्थ्यांशी डिजिटल संवाद साधला आहे.असा संवाद बहुदा पहिल्यांदाच घडला असावा. तो घडवून आणलाय पुणे जिल्ह्यातील जांभूळदरा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी. व्हिडिओ कॉलद्वारे हे शक्य झालं आहे. यावेळी दोन्ही देशातील विद्यार्थ्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या आणि चर्चा देखील केली. पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरातील रूट इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मन पुण्याच्या विद्यार्थ्यांनी जिंकली आहेत. पुणे जिल्ह्यातील जांभूळदरा येथील जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता सातवीपर्यंत वर्ग खोल्या आहेत. शाळेतील शिक्षक नागनाथ विभूते यांनी पाकिस्तान शाळेतील विद्यार्थ्यांशी विडिओ संवाद साधण्यासाठी कष्ट घेतले. त्यासाठी त्यांनी एज्युकेशन मायक्रोसॉफ्ट या वेबसाईटचा उपयोग केला. त्याद्वारे पाकिस्तान मधील शाळेतील विद्यार्थ्यांशी चर्चा घडवली.जिल्हा परिषद शाळेतील हा चौथा परदेशातील व्हिडिओ संवाद होता. या अगोदर अमेरिकेतील म्युझिअमशी विद्यार्थांनी व्हिडिओ संवाद साधला होता.

भारतीय विद्यार्थ्यांनी पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांना आपल्या तिरंगा राष्ट्रध्वजाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर इस्लामाबाद येथील रूट इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे राष्ट्रगीत म्हणून दाखवले. तर सिंधू नदीबद्दल भारतीय विद्यार्थ्यांनी माहिती दिली. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थाने चक्क पाकिस्तानच्या ध्वजाचे त्यांच्याच विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले. यावेळी व्हिडिओ संवाद साधणार्‍या पाकिस्तानी शिक्षिकेने त्याचे संवाद ऐकून कौतुक केले. हे सर्व सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा देखील भारतीय विद्यार्थ्यांनी सादर केला. त्यावेळी पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.

- Advertisement -

हा व्हिडिओ संवाद खूप छान झाला. आमची संस्कृती तसेच पाकिस्तान ध्वजाबद्दल भारतीय विद्यार्थ्यांनी खूप चांगली माहिती दिली. आपण पुन्हा अशी चर्चा घडवून आणू. अशा संवादाची दोन्ही देशांना गरज आहे.
सना मुघल, शिक्षिका, इस्लामाबाद

हा विडिओ संवाद विद्यार्थ्यांच्या खूपच फायद्याचा ठरत आहे. त्यांच्याकडील संस्कृती विद्यार्थ्यांना समजते. इंग्रजीमधून कसा संवाद साधायचा हे समजत.
-राजश्री शिंदे-भारतीय शिक्षिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -