घरमहाराष्ट्रपुणेVijay Shivtare : उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरली, वेळही ठरली; शिवतारेंनी लोकसभेचे...

Vijay Shivtare : उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरली, वेळही ठरली; शिवतारेंनी लोकसभेचे रणशिंग फुंकले

Subscribe

शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मोठी घोषणा केली आहे. 12 तारखेला 12 वाजता शिवतारे आपला अर्ज दाखल करणार आहेत.

पुणे : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी आज (ता. 24 मार्च) बारामती लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपली अखेरची भूमिका स्पष्ट केली आहे. 12 मार्चला 12 वाजता अपक्ष उमेदवार म्हणून विजय शिवतारे आपली उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे 12 तारखेला 12 वाजता उमेदवारी अर्ज भरत विरोधकांचे 12 वाजवणार, असा प्रण घेतल्याचे विजय शिवतारे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण याबाबता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कारवाई करण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Vijay Sivatare will file independent candidature for Baramati Lok Sabha)

हेही वाचा… Prakash Ambedkar : अखेर ठरले, प्रकाश आंबेडकर अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार

- Advertisement -

शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत पवार कुटुंबाविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली. याचवेळी त्यांनी बारामती लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मी शरद पवार यांचा माणूस असल्याचे सांगितले जातं आहे. मात्र मला फक्त अजित पवार यांचा पराभव करायचा आहे. मी लढतोय ते जिंकण्यासाठी. त्यामुळे 1 तारखेला पालखी तळावर सभा घेणार आणि 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा शिवतारेंकडून करण्यात आली आहे.

तसेच, 1 एप्रिलला लोकसभा निवडणुकीचे बिगुल पालखी तळावरील सभेच्या माध्यमातून वाजवण्यात येईल. त्यानंतर अपक्ष म्हणून मिळालेले उमेदवारीचे चिन्ह गावागावांतील घरांमध्ये पोहोचवण्यात येईल. त्यामुळे पुरंदरमधील सर्वपक्षीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच, गावागावात जाऊन विजय शिवतारे निवडणूक लढवणार आहेत, असे जाऊन सांगा, असेही विजय शिवतारे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर, बारामती लोकसभा मतदारसंघातील पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये जनजागृती सभा घेऊन आपले म्हणणे आणि विचार जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले. त्यामुळे आता विजय शिवतारे हे बारामती लोकसभेतून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -