घरताज्या घडामोडीसार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांचे निधन

सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांचे निधन

Subscribe

सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांचे निधन झाले ते ७५ वर्षांचे होते. औरंगाबादकर यांनी सन २०१२ पासून सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. त्यांच्या निधनाने सांस्कृतीक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे वडील मु.श.औरंगाबादकर यांनीही ५० वर्ष सार्वजनिक वाचनालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांचीच पंरपरा विलास औरंगाबादकर यांनी पुढे सुरू ठेवली. सन २००७ मध्ये कार्यकारी मंडळात त्यांची निवड झाली होती. २००८ ते २०११ या काळात ते वाचनालयाचे कार्याध्यक्ष होते. चिन्मय मिशनचे ते नाशिकचे अध्यक्ष होते. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. अखिल भारतीय फार्मसी इन्स्टिटयुटचे ते सदस्य होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -