घरताज्या घडामोडीभाजपला CBI, ED किती चौकशा लावायच्या त्या लावू देत - विनायक राऊतांचा...

भाजपला CBI, ED किती चौकशा लावायच्या त्या लावू देत – विनायक राऊतांचा इशारा

Subscribe

ज्यांनी शिवसेनेचे शेवट करु असे विधान केलं आहे त्यांची विसर्जन कसं झालं याची अनेक उदाहरणं राजकारणात पाहिली आहेत.

केंद्रीय मंत्री नाराय राणे यांच्या अटकेमध्ये शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच नारायण राणे यांनी देखील अनिल परब यांच्यावर आरोप केला होता. अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव टाकला असल्याचे सांगत या प्रकरणची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे. सध्या भाजपकडे सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू मंगू आहेत. भाजपने कितीही सीबीआय आणि ईडीच्या चौकशा लावू देत असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे. राणे जेवत होते की, नाटक करत होते असा सवालही विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते आशिष शेलार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर कितीही तपास यंत्रणेचा ससेमीरा लावला तरी सरकार भक्कम राहील असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे. भाजपकडे सध्या ईडी आणि सीबीआय हे दोन चंगूमंगू आहे. यामुळे भाजपविरोधात कोणी काय बोललं की लगेच त्यांच्यामागे चौकशी लावण्याचे रणनिती भाजपची आहे. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे कितीही चौकशा लावल्या तरी सरकार भक्कम राहील आणि आजही आहे असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

तेव्हा उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख

एका मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांनी मारण्याची भाषा करावी हे किती योग्य आहे. याचा भाजपने अभ्यास केला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविषयी वक्तव्य केलं तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते. त्यावेळी ते शिवसेना पक्षप्रमुख होते असे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

राणे जेवत होते का?

रत्नागिरी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटक केली तेव्हा राणे जेवत होते असं एका व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. पण राणेंच्या हातातील थाळीमधले पदार्थ बघितले तर राणे जेवत होते की, नाटक करत होते हे दिसून येईल. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेचे शेवट करु असे विधान केलं आहे त्यांची विसर्जन कसं झालं याची अनेक उदाहरणं राजकारणात पाहिली आहेत असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

- Advertisement -

सीबीआय चौकशीची वेळ आली

नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. राज्याचे एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांच्या अटक होण्यापुर्वीच अटकेबाबत कोर्टात ते नाकारण्यात येईल असा निवाडा घोषित करतात. हे सगळं प्रकरण संशयास्पद आहेत. यामध्ये आयपीएस अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये काय बोलणं झालं. निवाडा होण्यापुर्वीच निकाल जाहीर करण्याची राज्याची मंत्र्यांची भूमिका ही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यामुळे या सगळ्या प्रकरणची सीबीआय चौकशी होण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्र्यांच्याबाबत होत असल्यामुळे सीबीआय चौकशी करण्याची वेळ आली आहे. असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : आयुष्यात उंदीर मारला नाही, ते कोथळा काय बाहेर काढणार? – राणे


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -