घरमहाराष्ट्रनाशिकबोरिवलीच्या सेंट रॉक विधी महाविद्यालयाची शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाला...

बोरिवलीच्या सेंट रॉक विधी महाविद्यालयाची शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाला भेट

Subscribe

सेनापती बापट आणि साने गुरुजी या कारागृहात वास्तव्यास होते. 1927 आली निर्मिती झालेले हे ऐतिहासिक कारागृह आहे. "शामची आई" हे पुस्तक साने गुरुजींनी ह्याच कारागृहात 1933 साली लिहिले आहे. बंदीवानांना सुधारण्यासाठी संधी मिळावी म्हणून शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत असतात.

मुंबई : बोरिवली येथील श्री हरी एज्युकेशनल ट्रस्टच्या सेंट रॉक विधी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल 26 मार्च रोजी नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे नेण्यात आली. कोरोनानंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहाला भेट देणारे सेंट रॉक हे महाराष्ट्रातील पहिले विधी महाविद्यालय आहे. मुख्याध्यापिका ॲड. श्वेताली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड प्रफुल्ल साळवी, ॲड. अर्पिता शिर्के, ॲड. मनीषा पाठक, ॲड. करिष्मा पांडे ,ॲड. नितीन साळवी या प्राध्यापकांनी सहल यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

सेनापती बापट आणि साने गुरुजी या कारागृहात वास्तव्यास होते. 1927 साली निर्मिती झालेले हे ऐतिहासिक कारागृह आहे. “शामची आई” हे पुस्तक साने गुरुजींनी ह्याच कारागृहात 1933 साली लिहिले आहे. बंदीवानांना सुधारण्यासाठी संधी मिळावी म्हणून शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत असतात. 2020 च्या आठ महिन्यांच्या लॉकडाऊनच्या कालावधीत आर्थिक वर्षात येथील कैद्यांनी शासनाला 4 कोटी 37 लाखांचा महसूल मिळवून दिला. एकही कोरोना रुग्ण नसलेले ते राज्यातील पहिले कारागृह होते.

- Advertisement -

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात 2600 कैदी असून पक्क्या कैद्यांना विणकाम, सुतारकाम, शिवणकाम, चर्म कला, बेकरी, लोहकाम, धोबी काम, रसायन, मूर्तिकाम या 9 कारखान्यांच्या माध्यमातून रोजगार मिळतो. लोहकाम कारखान्याने 2020-21 मध्ये एक कोटी 68 लाखांसह प्रथम तर सुतारकाम कारखान्याने एक कोटी उत्पन्नासह दुसरा क्रमांक मिळवला. उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रात येरवड्यानंतर नाशिक कारागृहाचा दुसरा क्रमांक येतो.

निव्वळ शेतीचे उत्पन्न चाळीस लाख

गळाभेट, फोन कॉलिंग, शिक्षण, आरोग्य, चांगले जीवन आदी सुविधांमुळे कैदी प्रेरित होऊन काम करत आहेत. लंडनच्या राधास्वामी सत्संग मंडळाने येथील दर्जेदार सतरंज्या नेलेल्या आहेत. राज्यातील निरनिराळ्या ठिकाणांहून अंगाचे, कपड्याचे साबण, फिनेल, पलंग, खुर्च्यांना प्रचंड मागणी आहे. “महाबीज” ह्यांना नाशिक कारागृह बियाणे पुरवते. विधी महाविद्यालयाच्या सर्व भविष्यकालीन वकील विद्यार्थ्यांनी कारागृहाचे अंतर्गत व्यवस्थापन पाहिले आणि ते अत्यंत रोमांचित झाले.

- Advertisement -

सर्व भेटीनंतर नाशिक मध्यवर्ती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ आणि वरिष्ठ कारागृह निरीक्षक अशोक कारकर यांचे त्यांच्या शासकीय कार्यालयात प्रिन्सिपल श्वेताली पाटील यांनी शालफुलांचा गुच्छ देऊन स्वागत केले आणि धन्यवाद दिले.
महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता आणि त्याच महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना असलेल्या धनंजय जुन्नरकर यांनी सदर कारागृह भेटीसाठी परवानगी मिळावी म्हणून विशेष प्रयत्न केल्याने प्रिन्सिपल श्वेताली पाटील ह्यांनी त्यांचे देखील फुलांचा गुच्छ देऊन आभार मानले.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -