घरमहाराष्ट्रVideo : अमरावतीत राष्ट्रीय कृषी परिषदेत 'लावणी'

Video : अमरावतीत राष्ट्रीय कृषी परिषदेत ‘लावणी’

Subscribe

अमरावती जिल्ह्यात भाजपा आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी राष्ट्रीय कृषी परिषदेचे आयोजन केले होते. मात्र या परिषदेत लावणी सादर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील भाजपा आमदाराने भरवलेल्या कृषी परिषदेच्या मंचावर निवृत्त अधिकाऱ्याने केलेला डान्स चांगलाच चर्चेत आला आहे. कृषी परिषदेत नृत्याचे कार्यक्रम ठेवल्याने वाद निर्माण झाला असून कृषी परिषदेच्या नावाखाली भाजपाने अश्लील नाचांचा कार्यक्रम केला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

भाजपच्या आमदाराने केलं आयोजन

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे भाजपा आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय कृषी परिषदेचे आयोजन केले होते. या दरम्यान ९ फेब्रुवारीला लोककला दंडार कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एका निवृत्त नायब तहसीलदाराने मंचावर जाऊन लावणीवर थिरकला. या त्यांच्या प्रकाराने संपूर्ण शहरात वाद निर्माण झाला आहे. ही राष्ट्रीय कृषी परिषदे आहे की लावणी? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे. भाजपाच्या आमदाराने शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली भरवलेल्या कृषिविकास परिषदेत चक्क नाच – गाण्यांचा कार्यक्रम घेतला होता. कृषी परिषदेच्या नावाखाली भाजपाने अश्लील नाचांचा कार्यक्रमच केला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय कृषी परिषदेत निवृत्त अधिकाऱ्याची 'लावणी'

राष्ट्रीय कृषी परिषदेत निवृत्त अधिकाऱ्याची 'लावणी' | #MyMahanagar

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, 14 February 2019

दंडार कार्यक्रम म्हणजे काय?

दंडार कार्यक्रम म्हणजे या कार्यक्रमात नृत्यप्रसंगी पुरुष आणि महिला वेषभूषा करुन नृत्य करतात. यात द्विअर्थी संवादाच्या माध्यमातून सामाजिक विषयावर भाष्य केले जाते. मात्र, या परिषदेत नृत्याचे कार्यक्रम का आयोजित करावे, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

- Advertisement -

वाचा – ‘दोन बायका; भाजप आमदाराची फजिती ऐका!’

वाचा – मायवतींविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदाराचा माफीनामा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -