घरताज्या घडामोडीराज्यात वादळासह पावसाचा इशारा

राज्यात वादळासह पावसाचा इशारा

Subscribe

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबईने राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही याचा प्रभाव राहील.

वादळी वाऱ्यामुळेच मध्य महाराष्ट्रात तापमानात घट पाहायला मिळाली आहे. तर इतर भागात मात्र तापमानात विशेष फरक पडलेला नाही. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा याठिकाणी तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव येथे झाली होती. याठिकाणी ४२.४ डिग्री सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली. आगामी दोन दिवसात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापुर (आजरा), सांगली (जत), पंढरपूर, बार्शी, कागल, नाशिक, उस्मानाबाद याठिकाणीही पावसाने हजेरी लावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -