घरमहाराष्ट्रदिवसाआड पाणीपुरवठा असताना लाखो लिटर पाण्याची नासाडी

दिवसाआड पाणीपुरवठा असताना लाखो लिटर पाण्याची नासाडी

Subscribe

जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असून त्याला ओढ्याचे स्वरूप

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात अवघे १५ टक्के पाणी साठा आहे. पाण्याअभावी शहरातील नागरिक त्रस्त असून त्यांना दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. परंतु, यासमस्येकडे महानगर पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही. असे असताना शहरातील आकुर्डी आणि किवळे परिसरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांचा संताप होत आहे.

पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिक संतप्त

आकुर्डीच्या नवविकास प्राधिकरण इमारतीच्या शेजारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असून ओढ्याचे स्वरूप आले होते. त्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. एकीकडे नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत आहे. तर दुसरीकडे पाण्याची नासाडी होताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या घटनेत किवळे येथे सोमवारी, मंगळवारी आणि शुक्रवारी पाण्याच्या जलवाहिनीची गळती झाल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.

- Advertisement -

पवना धरणात तीन आठवडे पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक

दरम्यान, आजच्या किवळे येथील पाणी गळती विषयी पाणी पुरवठा अधिकारी रामदास तांबे यांना माहिती नसल्याचे सांगितले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ तीन आठवडे पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. सध्या पवना धरणात १५.६८ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तो आतापर्यंतचा सर्वात कमी साठा असल्याचे सांगण्यात येत आहे. मान्सून लांबणीवर असल्याने शहरातील नागरिकांना आणखी पाणी कपातीच्या संकटला सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची नासाडी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गळती होत असलेल्या जलवाहिनीमध्ये दुरूस्ती करण्यात आली असून, आज घडलेल्या घटनेबद्दल कोणतीही कल्पना नाही. बिजली नगर येथील जलवाहिनीच्या कामासाठी नको असणारे पाणी बाहेर सोडले जात असून ती कुठल्याही प्रकारच्या पाण्याची नासाडी नसल्याचे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील पाणी पुरवठा अधिकारी रामदास तांबे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -