घरताज्या घडामोडीकुर्ला परिसरातील काही भागात पाणीपुरवठा बंद, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

कुर्ला परिसरातील काही भागात पाणीपुरवठा बंद, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Subscribe

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व उपनगरांमधील ‘कुर्ला पश्चिम’ येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर एक्सप्रेस इन् हॉटेलच्या समोर, साकीनाका येथे झडपा बसविण्याचे काम करण्याचे काम मंगळवार, दिनांक १० मे २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार, दिनांक ११ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

सदर कालावधीत म्हणजेच मंगळवार, दिनांक १० मे २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार, दिनांक ११ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ‘एल’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तर काही विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

- Advertisement -

त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे :

१) ‘एल’ विभाग – जरीमरी, शांती नगर, तानाजी नगर, श्री कृष्णा नगर , सत्या नगर पाईप लाईन मार्ग, वृन्दावन खाडी नंबर ३, आशा कृष्णा इमारत, अन्नासागर इमारत, तिलक नगर, साईबाबा कंपाऊंड , डी सिल्वा बाग, एल. बी. एस. नगर, शेठीया नगर, सोनानी नगर, महात्मा फुले नगर, बरेली मस्जिद परिसर, शिवाजी नगर, अंधेरी कुर्ला मार्ग, अनिस कंपाऊंड, अंबिका नगर, सफेद पूल, उदय नगर – (सकाळी ६.०० ते दुपारी १.०० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान दिनांक १० मे २०२२ रोजी पाणीपुरवठा सकाळी ६.०० ते सकाळी १०.०० या वेळेत होईल आणि सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. दिनांक ११ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा सकाळी १०.०० पर्यंत पाणीपुरवठा होणार नाही आणि सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.).

- Advertisement -

२) ‘कुर्ला दक्षिण’ – काजूपाडा, बैल बाजार, नवपाडा, एल. बी. एस. मार्ग, सुंदरबाग, ख्रिश्चन गांव, न्यू मिल मार्ग, हलाव पूल, मसरानी गल्ली, ब्राह्मण वाडी इत्यादी – (सायंकाळी ६.३० ते सकाळी ८.४५ ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान दिनांक १० मे २०२२ आणि दिनांक ११ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.).

वरील तपशिलानुसार संबंधीत परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


हेही वाचा : Russia-Ukraine war: रशियाकडून युक्रेनमधील शाळेवर बॉम्बहल्ला, ६० जणांच्या मृत्यूची शक्यता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -