घरताज्या घडामोडीआदित्यजी.. श्रद्धा जाधव, सूरज चव्हाणमुळे मी पक्ष सोडला - अमेय घोले

आदित्यजी.. श्रद्धा जाधव, सूरज चव्हाणमुळे मी पक्ष सोडला – अमेय घोले

Subscribe

मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक अमेय घोले यांनी युवासेनेतील पदाचा राजीनामा दिला आहे.

मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक अमेय घोले यांनी युवासेनेतील पदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाच्या महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी वारंवार कामात अडथळे निर्माण केल्याचे आरोप करत अमेय घोले यांनी राजीनामा दिला आहे. (I left the party because of Shraddha Jadhav Suraj Chavan says thackeray group corporator Amey Ghole vvp96)

अमेय घोले यांनी आपल्या राजीनाम्याबाबत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून अमेय घोले यांनी राजीनामा दिला आहे. याशिवाय, आपलं महानगरशी बोलतानाही अमेय घोले यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. तसेच, ‘पुढे काय होतं हे पाहू’, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

‘श्रद्धा जाधव आणि सूरज चव्हाण यांनी वारंवार माझ्या कामात अडथळे आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे मला काम करताना खूप त्रास व मनस्ताप झाला. याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती’, असे अमेय घोले यांनी या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

अमेय घोलेंच्या पत्रात काय?

मी राजकारणात आलो तुमच्यामुळे. तुम्ही माझ्या वर विश्वास दाखवलात आणि मला युवा सेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी गेले १३ वर्ष अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडली. परंतु वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करत असताना महिला संघटक मा. सौ. श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणायचा प्रयत्न केला त्यामुळे मला काम करताना खूप त्रास व मनस्ताप झाला.

याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती. संघटनेतील काही मतभेद दूर व्हावे व मला सुरळीतपणे माझे कार्य सुरू ठेवता यावे म्हणुन मी खूप प्रयत्न केला. परंतु काही कारणास्तव यावर काहीच मार्ग काढला गेला नाही. त्यामुळे आज अखेरीस जड अंतःकरणाने मला युवासेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे. सांगण्यास अत्यंत दुःख होत आहे की आज मी माझ्या युवासेनेच्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.

आदित्य जी आपली मैत्री ही केवळ राजकारणापुरती नाही. तुमच्या बरोबरचा संघटनेतील माझा प्रवास थांबवत असलो तरी आपली मैत्री कायम राहावी हीच अपेक्षा व्यक्त करतो.


हेही वाचा – दिवसभरातील दौरे रद्द? राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण, म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -