घरमहाराष्ट्रआम्ही येथे आलो कारण जळगाव शिवसेनेचं आहे; गुलबराव पाटील यांच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर

आम्ही येथे आलो कारण जळगाव शिवसेनेचं आहे; गुलबराव पाटील यांच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर

Subscribe

जळगाव : जळगावातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरेंची उद्या सभा होणार आहे. या सभेत चौकटीत बोला अन्यथा, तुमच्या सभेत घुसू असा धमकी वजा इशारा गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिला होता. या धमकी उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, आम्ही जळगावात आलो कारण जळगाव शिवसेनेचं आहे.

शिवसेना फुटीनंतर जळगावात पहिल्यांदाच शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सभा होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माजी आमदार दिवंगत आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मात्र या सभेआधीच आरोप-प्रत्यरोप सुरू झाले आहेत. शिंदे गटाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सभेत संजय राऊतांसारख माणूस माझ्याविरुद्ध काही बोलत असेल तर, मी एसपींना पत्र देणार आहे. संजय राऊतांनी चौकटीत राहून बोलावे, अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेल असा धमकी वजा इशारा त्यांनी दिला होता. परंतु गुलाबराव पाटलांचा रोष नेमका उद्धव ठाकरेंकडे की संजय राऊतांकडे आहे, यावरून चर्चेला उधाण आले होते.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, सभेत घुसू असे  आवाहन दिले होते, पण जळगावात आम्ही आलो कारण जळगाव आमचं आहे शिवसेनेचं आहे, असे वक्तव्य करताना त्यांनी गुलाबराव पाटलांना उत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, उद्या दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जळगावला येतील आणि त्यानंतर ते पाचोऱ्याला सभेसाठी जातील. आमचे माजी आमदार अरुण दत्ता पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे आणि इतर काही कार्यक्रम आहेत. त्यानंतर संध्याकाळी पाचोऱ्यात जाहिर सभा आहे. असा एकंदरीत हा कार्यक्रम आहे. प्रदीर्घ काळानंतर पाचोऱ्यात सभा होत आहे. संपूर्ण जळगावपासून पाचोऱ्यापर्यंत आणि आजूबाजूला या सभेला मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. संपर्क प्रमुख संजय सावंत आणि त्याचे सहकारी, जिल्हाप्रमुख काम करत आहेत. शिवसेनेच्या आतापर्यंत जश्या सभा महाराष्ट्रात झाल्या आहेत त्याच तोडीची उद्याची सभा होणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -