Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम भूमाफिया, राजकारण्यांमुळे ११ वर्षे ‘पद्मश्री’पासून वंचित : गायक सुरेश वाडकर

भूमाफिया, राजकारण्यांमुळे ११ वर्षे ‘पद्मश्री’पासून वंचित : गायक सुरेश वाडकर

नाशिकमधील जमीनप्रकरण त्रासदायक

Related Story

- Advertisement -

नाशिक शहरातील जमीन खरेदीप्रकरण न्यायप्रविष्ठ आणि पोलीस ठाण्यात तक्रार असल्यामुळे ११ वर्षे पद्मश्री पुरस्कारापासून वंचित रहावे लागले. पुरस्कार देण्यापुर्वी पंतप्रधान कार्यालयातून तपासणी करण्या आली होती. त्यामध्ये नाशिकमधील पोलीस ठाण्यात जमीन व्यवहारप्रकरणी तक्रार असल्याचे समोर आले. केस निकाली निघाल्यानंतर भारत सरकारतर्फे पदमश्री पुरस्कार निश्चित झाला. राजकारण्यांनी जमीनप्रकरणात फक्त दिलासा पण काम केले नाही. त्यामुळे अनेक अडचणींना समोरे जावे लागले. जमीनप्रकरण नसते तर ११ वर्षांपुर्वीच पद्मश्री पुरस्कार आणि आता पदमविभूषण पुरस्कार मिळाला असता, अशी खंत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या भू- माफिया या शॉर्टफिल्म रिलीजचा कार्यक्रम मंगळवारी (दि.३) गायक डॉ. सुरेश वाडकर व त्यांची पत्नी पद्मा वाडकर यांच्या हस्ते नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुरेश वाडकर व त्यांची पत्नी पदमा वाडकर यांनी तुमसे मिल के ऐसा लगा हे सादर केले. त्यानंतर वाडकर यांनी चप्पा चप्पा चरके चले, औनी बौनी आअरियाँ तेरी ही हे गीत सादर केले. या दोन्ही गाण्यांनी उपस्थितीत पोलीस अधिकारी व रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

- Advertisement -

वाडकर म्हणाले, नाशिकमधील भू-माफियामुळे ११ वर्षे त्रास झाला. गायक असल्याने अनेक अधिकारी सांगत असायचे की, सकाळी उठलो की पहिली कॅसेट लावतो. तुमच्यावर आमचे खूप प्रेम आहे पण तुमचे काम करणार नाही. ११ वर्ष संघर्ष करावा लागला. पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी आता माझी सुटका केली आहे. त्यांच्यामुळे जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. नाशिकमध्ये मुक्तीधाम परिसरात ११ वर्षांपूर्वी सोन निगम यांच्यासोबत मित्राच्या मध्यस्थीने कोट्यावधी रुपयांची जमीन खरेदी केली. पण मध्यस्थी आणि संबंधित व्यक्तीने बनावट कागदपत्रांव्दारे फसवणूक केली. पहिल्या बैठकीत ठरविक रक्कम दिली होती. स्वरलिपी वाचणारा व्यक्ती आहे. मला शासकीय भाषा समजत नव्हती. मध्यस्थी मित्र असल्याने त्याच्यावर विश्वास होता. सुरुवातीला ती जमीन न्यायप्रविष्ठ आहे हे समजले नव्हते. त्यावेळी गीत सोनू निगमही पार्टनर होता. नाशिकमधील मुलांना संगीताचे शिक्षण मिळावे, यासाठी म्युझिक स्कूल सुरु करणार आहे. पेपर नोटीस शेवटपर्यंत मिळाली नव्हती. त्यातून फसवणूक झाली. मूळ मालकाने त्यावेळी फसवणुकीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. जमीन नावावर करण्यासाठी अनेक प्रभासकीय अडचणी आल्या. पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी जमीनप्रकरणात लक्ष घातल्याने आता वनवास संपला आहे.

नवोदित कलाकार व गीतकारांसाठी शाळा काढणारच आहे. नाशिकमध्ये हुशार व गुणवंत मुलेमुली आहेत. नाशिकमधून अनेक मुले मुंबईलाही येत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये म्युझिक शाळा काढणारच आहे, असे वाडकर यांनी सांगितले.

विनोद तावडेंनीसुद्धा मदत केली नाही

- Advertisement -

राजकारण्यांनी फक्त दिलासा पण काम झाले नाही. याप्रकरणी तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सुरेश वाडकर यांनी असे का म्हणावे, असा प्रश्न उपस्थित केला होता. या संदर्भात बातमीसुद्धा वृत्तपत्रांमध्ये आली होती. तावडे हे मित्र असल्याने त्यांना कॉलसुद्धा केला होता. त्यांना म्हटले होते की, १५ दिवसांची सुटी घे, नाशिकमध्ये दोघेजण येऊ आणि माझे काम करुन दे. यात काही चुकीचे नव्हते. राजकारणातील दिग्गज मंत्री असताना काम होत नाही का, मात्र शेवटपर्यंत काम झाले नाही, अशी खंत वाडकर यांनी व्यक्त केली.

म्हणून भारतात राहायचे नाही असे म्हटले होते

नाशिकमधील जमीनप्रकरणात खूप त्रासा झाला. त्यामुळे भारतात राहायचे नाही, असे मत झाले होते. बसल्या बसल्या अधिकरी म्हणायचे, एवढे लाख रुपये द्या, तेवढे लाख रुपये असे म्हणत. संबंधित अधिकारी गीतकार असल्याने सुरुवातीला मान-सन्मान द्यायचा पण कामाची वेळ आली की मागे सरकायचा. अमेरिकेत एका खिडकीवर सर्व कामे होतात. या ठिकाणी म्युझिक स्कूल आहे. महापालिका, अग्नीशमन दल व शाळांचे व्यवस्था आहे पण महाराष्ट्रात एका कामासाठी २२ चकरा माराव्या लागतात. त्यातून भारतात राहायचे नाही, असे मत झाले होते, असे सुरेश वाडकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रीय व्यकींनीच फसवल्याने सोन निगमची माघारी

सुरेश वाडकरजी आप महाराष्ट्रीयन है, आपके ही लोग आपको ऐसा कर है, तो मेरे पैसे मुझे दे दो, असे सोनू निगम यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना परत त्यांचे पैसे द्यावे लागले, असेही वाडकर यांनी सांगितले.

राजकारण्यांकडून फक्त दिलासा

ज्याला करायचे नसते तो तोंडावर गोड बोलतो. लोकप्रतिनिधी व अधिकारी जमीनप्रकरणात सुरुवातीला दिलासा द्यायचे पण काम करायचे नाही. मोठ मोठ्या लोकांचे कॉलही आले पण कोणीही काम केले नाही. खंबीरपरणे व जबाबदारीने एकही व्यक्ती मिळाला नाही, असेही वाडकर यांनी सांगितले.

- Advertisement -