Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "प्रकाश आंबेडकरांना नक्की विजयी करू", ठाकरे गटाच्या 'या' आमदारांचा विश्वास

“प्रकाश आंबेडकरांना नक्की विजयी करू”, ठाकरे गटाच्या ‘या’ आमदारांचा विश्वास

Subscribe

मुंबई : वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सामील होणार आहे की नाही, यासंदर्भात अद्यापही स्पष्टता झालेले नाही. पण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छ व्यक्त केली आहे असून ठाकरे गटाने प्रकाश आंबेडकरांना निवडणूक आण्याच्या दृष्टीने कामाला देखील लागल्याची माहिती मिळाली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या आहेत.

यानंतर ठाकरे गटाचे आमदार यांनी बैठकीसंदर्भात बोलताना म्हणाले, “उद्धव ठाकरे हे अकोला लोकसभा आणि विधासभा निवडणुकीसाठी जिल्ह्या निहाय आढावा घेत असून भाजपला पराभूत करायचे असेल, तर शिवसेनाला जास्तीत जास्त जागा मिळाव्याच्या असतील. महाविकास आघाडीने अकोल्याची जागा शिवसेना मिळावी आणि ती जागा मिळणार नसेल. अकोल्यातून वंचितचे प्रकाश आंबेडकर येथून लढणार असेल तर आम्ही त्यांना विजयी करू आणि कोणत्याही परिस्थितीत भाजपला जागा जिंगू देणार नाही”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘मविआ’मध्ये वंचित सामील होण्याच्या प्रतिक्षेत

- Advertisement -

मागील 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते ही वंचित बहुजन आघाडी मिळाली होती. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात सत्ता आली नाही. 2019 मध्ये दोन्ही निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणून हिणविले जात होते. यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंसोबत युती केल्याने ते माहविकास आघाडीत सामील होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. पण अद्यापही महाविकास आघाडीकडून वंचित सामील झाल्याचे अधिकृत काही माहिती आलेली नाही. पण प्रकाश आंबेडकर यांना अकोला लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिली.

हेही वाचा – कांदा पेटला, नाशिक-पुणे महामार्ग केला ठप्प; राष्ट्रवादीने आक्रमक होत केला चक्काजाम

संजय राऊत लोकसभा निवडणूक लढणार?

- Advertisement -

ईशान्य मुंबई मतदारसंघातून संजय राऊत हे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली आहे. यात संजय राऊतांनी निवडणूक लढविली तर ही त्यांची पहिली लोकसभा निवडणूक असू शकते. संजय राऊत हा चार वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

- Advertisment -