घरताज्या घडामोडीआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी शरद पवारांची मोठी घोषणा

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी शरद पवारांची मोठी घोषणा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथं राष्ट्रवादीकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वाढदिवसानिमित्तानं शरद पवार यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी सर्वांचे आभार मानले. शरद पवार यांचा वाढदिवसाचा आजचा दिवस राष्ट्रवादीकडून ‘बळीराजा कृतज्ञता दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने राज्यभरातील कार्यकर्त्यांनी ८० लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. हा निधी राष्ट्रवादीच्या कोषात जाणार आहे आणि राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शिक्षणासाठी या निधीचा वापर केला जाईल, अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे.


हेही वाचा – ‘भाजपने घाणेरडी वागणूक दिली’; अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

- Advertisement -

आपली बांधलीक समाजातल्या शेवटच्या व्यक्तीसोबत – शरद पवार

‘संकटाला सामना करण्यासाठी जी शक्ती येत असते ती शक्ती कुठून आली? तर ती शक्ती आई आणि सर्वसामान्य माणूस यांच्याकडून आली. सत्तेमध्ये असताना अनेक धोरणं आणि कार्यक्रम राबावता येतात. पण ते खऱ्या अर्थाने शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचलं की नाही? ते सत्तेतून बाहेर पडतल्यावर जाणवतं. आपली बांधलकी समाजातल्या शेवटच्या माणसाशी आणि नवीन पिढी सोबत आहे’, असे शरद पवार म्हणाले.


हेही वाचा – ‘काँग्रेसचे हमाल, दे धमाल’; शेलारांची शिवसेनेवर टीका

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

‘आज तुम्ही या ठिकाणी ८० लाखांचा धनादेश दिला. मी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये चौकशी केली. कार्यकर्त्यांनी हा सर्व धनादेश उभा केला. आता याचं काय करायचे? राष्ट्रवादीच्या वतीनं आपलं एक राष्ट्रवादी वेलफेयर ट्रस्ट आहे. ती रक्कम त्या ठिकाणी पाठवली जाईल. ज्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाने शेतीतील नापीकमुळे, दुष्काळामुळे, कर्जामुळे आत्महत्या केली आणि ते कुटुंब उघड्यावर पडले, त्या कुटुंबियांच्या शिक्षणासाठी हा निधी वापरला जाईल. ही रक्कम फिक्स डिपॉजीटमध्ये ठेऊ. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या नावाने प्रत्येकी १ लाख रुपये फिक्स डिपॉजिट ठेवायचे. त्यातील ५० हजार मुलांच्या शिक्षणासाठी तर ५० हजार मुलाच्या आईच्या नावाने जिल्हा बँकेत फिक्स डिपॉजीट म्हणून ठेवले जातील. अर्थात ही रक्कम काही मोठी नाही. मात्र, ही रक्कम जशी वाढेल, तशी मदत केली जाईल, असं शरद पवार म्हणाले’, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -