घरमहाराष्ट्रWeather Forecast : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भात 'ऑरेंज अलर्ट'

Weather Forecast : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

Subscribe

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यात ऐन थंडीच्या दिवसात आज (२८ डिसेंबर) आणि उद्या (२९ डिसेंबर) पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला तर काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागपूर आणि विदर्भात २८, २९ डिसेंबरला मेघ गर्जनेसह जोरदार पावसाचा व जोरदार वाऱ्यांचा अंदाज (weather forecast) व्यक्त करण्यात आला आहे.

डिसेंबर महिन्यात पडणाऱ्या थंडीचा जोर कमी झाला असून हवामानात मोठे बदल होत आहेत. या अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. यात जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली,गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

विदर्भ रेड तर मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात २८ डिसेंबरला औरंगाबाद, जालना आणि गोंदिया जिल्ह्याला यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. तर अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय जळगाव, परभणी, हिंगोली, नाशिक, नांदेड, धुळे जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

२९ डिसेंबरला नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूरला यलो अलर्ट घोषित केला आहे. याशिवाय नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरंगबाद जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.


Omicron Variant : आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणावर ओमिक्रॉनचे संकट; जगभरात हजारो उड्डाणे रद्द

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -