घरताज्या घडामोडीWeather Update: यूपी-बिहारसह काही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; महाराष्ट्रात काय स्थिती?

Weather Update: यूपी-बिहारसह काही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; महाराष्ट्रात काय स्थिती?

Subscribe

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. काही राज्यांमध्ये दररोज होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागांमध्ये १० ऑगस्टपासून मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर हिमाचल प्रदेशात १५ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे. उत्तराखंडसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

तसेच पश्चिम बंगाल, सिक्किम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये व्यापक पावसाची शक्यता आहे. पुढील ५ दिवसांमध्ये ईशान्य आणि उप-हिमालयीने पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील २ दिवसांमध्ये मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

- Advertisement -

स्कायमेट वेदरच्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत पश्चिम बंगाल, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, बिहारमधील काही भाग आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारत, किनारपट्टीलगतच्या आंध्र प्रदेश, लक्षद्वीप आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये हलका आणि मध्यम स्वरुपात पाऊस पडू शकतो. उर्वरित पश्चिम हिमालय, पंजाबमधील काही भाग, हरियाणा, दिल्ली, उर्वरित उत्तर प्रदेश, कोकण आणि गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, केरळ, अंदमान आणि निकोबार बेट, छत्तीसगढ आणि उर्वरित मध्य प्रदेश येथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. तसेच तामिळनाडू, आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटक आणि दक्षिण गुजरातमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – Viral Video: मास्क नसल्यामुळे लावला दंड, तर महिलेने नागरी संरक्षण महिला कर्मचारीला केली मारहाण


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -