घरमहाराष्ट्रबापरे! सांगलीच्या स्मशानभूमीत प्रेत जळतंय अर्धवट

बापरे! सांगलीच्या स्मशानभूमीत प्रेत जळतंय अर्धवट

Subscribe

सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत प्रेत अर्धवट जळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत प्रेत अर्धवट जळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरधाम स्मशानभूमीत प्रेत जळण्यासाठी देण्यात येणारी लाकडे ही निकृष्ट दर्जाची असल्याने असल्याने प्रेत अर्धवट जळालेल्या स्थितीमध्ये आढळले आहे. यामुळे प्रेताची विटंबना होत असल्यामुळे नागरिकांकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे.

मोठी लाकडे उपलब्ध नसल्याने प्रेत जळण्यास अडथळा

अमरधाम स्मशानभूमीत प्रेत जाळण्यासाठी देण्यात येणारी लाकडे ही निकृष्ट दर्जाची असून या लाकडामध्ये नागरिकांना फसवले जात आहे. या स्मशानभूमीत मोठ्या लाकडांची कमतरता असल्याने प्रेत नीट जळत नाही अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी महापालिका आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. महापालिकेकडून प्रेत जाळण्यासाठी देण्यात येणारी लाकडे ही संपूर्ण ओली असतात त्यामुळे प्रेत जाळण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. असाच एक प्रकार आज उघडकीस आला आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित ठेकेदार आणि महापालिका अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नागरिकांच्यामध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.

- Advertisement -

नगरपालिकेकडून प्रेत जाळण्यासाठी ३०० किलो लाकडे दिली जातात. मात्र, त्या लाकडाचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असतो. कारण जी लाकड दिली जातात ती ओली असून त्या लाकडामुळे प्रेत पूर्णपणे जळून जात नाही. ही संपूर्ण जबाबदारी ही नगरपालिकेची असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच याकरता लागणारे पैसे सुद्धा नागरिकांच्या टॅक्समधून घेतले जातात. मात्र, प्रेत जाळण्यासाठी छोटी – छोटी लाकड देतात. विशेष म्हणजे या लाकडांमध्ये फळ्यांचा देखील समावेश असतो आणि एखाद्यावेळेस लाकड कमी आहेत किंवा ती जळत नसल्याचे दाखवल्यास अधिकची लाकडे खरेदी करण्यास सांगितले जाते. – संदिप सावंत; स्थानिक नागरिक


हेही वाचा – धक्कादायक…तरुणीचे अर्धनग्न फोटो फेसबुकवर केले अपलोड

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -