घरमहाराष्ट्रसरव्हायकल कॅन्सरचं प्रमाण का वाढतंय? तारुण्यातच कसा रोखाल धोका?

सरव्हायकल कॅन्सरचं प्रमाण का वाढतंय? तारुण्यातच कसा रोखाल धोका?

Subscribe

Cervical cancer Awareness Month | लसीकरणामुळे ९३ टक्के प्रकरण कमी होऊ शकतात. याशिवाय नियमित पॅप स्मीअर (Pap Smear) आणि एचपीव्ही चाचणी (HPV test) करून घेणं आवश्यक असून याबाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे.

Cervical cancer Awareness Month | मुंबई – गेल्या काही वर्षांपासून महिलांमध्ये Cervical cancer चं प्रमाण वाढत जात आहे. हा कर्करोग अतिशय घातक असला तरी वेळीच निदान व उपचार झाल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. डब्ल्यूएचओनुसार, भारतात २०१९ मध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने अंदाजे ४५,००० महिलांचा मृत्यू झाला होता. कर्करोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे (Cervical cancer) होणारे मृत्यू टाळण्यासाठी एचपीव्ही लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. लसीकरणामुळे ९३ टक्के प्रकरण कमी होऊ शकतात. याशिवाय नियमित पॅप स्मीअर (Pap Smear) आणि एचपीव्ही चाचणी (HPV test) करून घेणं आवश्यक असून याबाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे.

हेही वाचा – महिलांनी वाढत्या वयासह कराव्यात ‘या’ टेस्ट

- Advertisement -

एसआरव्ही रुग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजी सल्लागार डॉ. मेघल संघवी म्हणाल्या की, ‘‘भारतीय महिलांमध्ये आढळून येणारा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अधिक दिसून येत आहे. अस्वच्छता, जागरूकतेचा अभाव आणि अपुरी वैद्यकीय सुविधा ही यामागील मुख्य कारण आहेत. याव्यक्तिरिक्त लैंगिक संबंध, एकाधिक लैंगिक पार्टनर, धुम्रपान यामुळेही कर्करोगाचा धोका अधिक असतो. तसेच एचआयव्ही/एड्ससारख्या रोग प्रतिकारशक्ती कमी करणारे किंवा प्रत्यारोपण केलेल्या लोकांनाही धोका असू शकतो.’’

डॉ. संघवी पुढे म्हणाल्या, “मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्राव आणि रजोनिवृत्तीनंतर तीव्र रक्तस्त्राव ही गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असल्याची लक्षणं आहेत. दुर्दैवाने गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोगाची लक्षणं पटकन दिसून येत असल्याने उशीरा निदान झाल्यास गुंतागुंत वाढू शकते. यामुळे कर्करोगाचे प्राथमिक स्थितीमुळे निदान व्हावे, यासाठी नियमित तपासणी करून घेणं गरजेचं आहे.”

- Advertisement -

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राणा चौधरी म्हणाल्या की, “गर्भाशयाच्या कर्करोगाचा पूर्व टप्पा १० ते १५ वर्षांपर्यंत असतो, त्यामुळे सध्या पॅप स्मीअर चाचणीने आणि रोगाचे लवकर निदान करून त्याचे सहज निदान करता येते. सर्वसाधारणपणे, दर तीन वर्षांनी पॅप चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो आणि २१ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ६५ वर्षांपर्यंतच्या लैंगिकदृष्ट्या सक्रिय महिलांमध्ये एचपीव्ही चाचणी करून घ्यावी.”

एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुहास आग्रे म्हणाले की, ‘‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा उच्च धोका असलेल्या मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) स्ट्रेनमुळे होतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, एखाद्या महिलेची रोगप्रतिकारक शक्ती एचपीव्हीला संसर्गानंतर कर्करोग होण्याचा धोका कमी करतो. एचपीव्ही संसर्ग होण्याचे सर्वात सामान्य कारण लैंगिक मार्गाने आहे. ज्या स्त्रिया लहान वयात लैंगिकदृष्ट्या सक्रिय असतात किंवा अनेक भागीदार असतात त्यांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.’’

“लैंगिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्या महिलांना वयाच्या २३ वर्षांनंतर पॅप स्मीअर चाचणी करता येऊ शकते. तर ३० वर्षांच्या वयानंतर दर तीन वर्षांनी ही चाचणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. वेळीच निदान झाल्यास कर्करोगावर उपचार करणं शक्य होतं. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लसीकरण फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे ९ ते १४ वयोगटातील मुलींना ही लस घेण्याची शिफारस केली जाते. २६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना देखील लसीकरण केले जाऊ शकते.” डॉ. संघवी यांनी सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -