घरमहाराष्ट्रनथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्याचे काय करणार?, सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल

नथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्याचे काय करणार?, सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल

Subscribe

मुंबई – देशातला पहिला दरशतवादी नथुराम गोडसेचे रक्तरंजित कपडे आजही जपून ठेवले जातात. अस्थि जपून ठेवल्या जातात. जयंती, पुण्यतिथीच्या माध्यमातून दरवर्षी गांधींच्या फोटोला गोळ्या मारल्या जातात. हे तुमचे हिंदुत्व आहे का? या कूबह मेननच्या कबरीचे काय करायचे ते केले पाहिजे. त्याचे समर्थन कोणी करणार नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे. मात्र, नथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्यांचे काय? हा प्रश्न संघ, भाजपला विचारायला पाहिजे असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी केला आहे.

याकूब मेननच्या कबरीवर फुले चढवणे, सजावट करणे हे वाईट आहे. त्याचे समर्थन कुणी करू शकत नाही. याकूब मेननची फाशी आणि त्यावरील अंमलबजावणी भाजपा काळात झाल्या. जर अमेरिकन सरकार लादेनचा मृतदेह समुद्रात टाकतं तर अशीच कृती याकूब मेननच्या बाबतीत तुम्हाला का सुचली नाही? मूळात मृतदेह दफन करण्याची परवानगीच का दिली? असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण – 

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननच्या कबरीवर मार्बल आणि लायटींग लावण्यात आली आहे. मुंबईच्या बडा कब्रिस्तान येथे हा प्रकार घडला आहे. मेननच्या कबरीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर यावरून उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे याकूब मेननच्या कबरीचं सुशोभिकरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले. या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्यांची नावे समोर आली पाहिजे. हा देशद्रोहाचा प्रकार असून ज्यांनी कुणी सुशोभिकरणासाठी परवानगी दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -