घरमहाराष्ट्ररोहित पवारांकडे रेमडेसिवीरचा साठा कुठून आला?; दरेकरांचा नवाब मलिकांना प्रतिसवाल

रोहित पवारांकडे रेमडेसिवीरचा साठा कुठून आला?; दरेकरांचा नवाब मलिकांना प्रतिसवाल

Subscribe

रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यावर इंजेक्शनच्या साठेबाजीचे आरोप केले. नंदुरबार भाजपच्या नेत्यांनी रेमडेसिवीरची इंजेक्शन वाटली त्यांच्याकडे FDA चा परवाना होता काय? असा सवाल मलिक यांनी केला. यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांना प्रतिसवाल केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडे रेमडेसीवीरचा साठा कुठून आला? असा प्रतिसवाल केला आहे.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीनं सोलापूरसाठी राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार यांच्या हस्ते तिथल्या माजी नगरसेवकांकडे दिल्याचे फोटो समोर आले आहेत. मग या ठिकाणी ट्रस्ट कुठून आली? रोहित पवारांकडे साठा कुठून आला? त्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली का? आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट अशी यांची प्रवृत्ती असल्याचं दरेकरांनी म्हटलं.

- Advertisement -

भाजप नेत्याकडे रेमडेसिवीरचा साठा – मलिक

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि भाजपच्या नेत्यावर मोठा आरोप केला आहे. भाजपचे नेते शिरीष चौधरी नंदुरबारमधील हॉटेलमध्ये हजारो इंजेक्शनचा साठा असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. कोणाच्या परवानगी नंदुरबारमध्ये रेमडेसिवीरची इंजेक्शन वाटली, असा सवाल देखील मलिक यांनी केला. यावेळी त्यांनी FDA ने नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून चौकशी करण्यास सांगितलं आहे, अशी माहिती दिली.


हेही वाचा – भाजप नेत्याच्या नंदुरबारमधील हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा – नवाब मलिक

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -