घरमहाराष्ट्रकोणाला घाबरताय? संभाजीनगर नामकरणावरून राऊतांचा भाजपाला सवाल

कोणाला घाबरताय? संभाजीनगर नामकरणावरून राऊतांचा भाजपाला सवाल

Subscribe

मुंबई – उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करायला काय अडचण आहे असा सवाल उपस्थि करत केंद्राने हा प्रस्ताव का रखडवून ठेवला असाही प्रश्न आज त्यांनी उपस्थित केला. आज मुंबईत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

महाविकास सरकारच्या काळात औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याकरता भाजपाकडून गर्जना करण्यात येत होती. याबाबत आव्हान दिले जात होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात नामकारणाचा निर्णय घेतला. औरंगाबादचे नाव संभागीनजर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठवण्यात आला. उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्यानंतर केंद्राला आणखी वेळ कशाला हवाय, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

- Advertisement -

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव केंद्राने का रखडवून ठेवला आहे? यामागचं कारण काय? राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतरही या शहरांबाबत केंद्र सरकार भूमिका घ्यायला तयार नाही. केंद्र सरकार कोणाला घाबरत आहे. कोणता नियम आणि कायदा आड येतोय, यामध्ये भूमिका मांडण्यासारखं काय आहे, असे अनेक सवाल संजय राऊतांनी उपस्थित केले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहाराचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला. मात्र, लागलीच राज्यात सत्तापालट झाली. यामुळे नव्या सरकारने जुन्या सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली होती. त्यामुळे औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला स्थगिती देण्यात आली होती. यावरून टीका होताच, शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा विशेष बैठक बोलावत दोन्ही शहरांच्या नामकरण प्रस्तावाल मंजुरी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -