घरमहाराष्ट्रमुदतीनंतर ४ दिवसही थांबणार नाही - जरांगे

मुदतीनंतर ४ दिवसही थांबणार नाही – जरांगे

Subscribe

मराठा समाजाला आरक्षणासाठी आम्ही सरकारला याआधीच ४० दिवसांची मुदत दिली होती. ४० पैकी ३० दिवस झाले आहेत. तुमच्या हातात १० दिवस उरले आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर मुदत संपल्यावर ४ दिवसही थांबणार नाही. ४०व्या दिवशी काय करणार ते सांगू, असा इशारा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी सरकारला दिला.

जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये शनिवारी १०० एकरच्या मैदानात मनोज जरांगेंची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मराठा समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जरांगे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सरकारला इशारा दिला. ते म्हणाले की, मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आहे. तुमच्या हातात १० दिवस शिल्लक आहेत. १० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. १० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, मात्र जर तुम्ही नाही दिले, तर मग ४०व्या दिवशी सांगू. मुदत संपल्यानंतर ४ दिवसही थांबणार नाही, असे ते म्हणाले.

- Advertisement -

भुजबळांना इशारा
आपल्या भाषणादरम्यान जरांगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांवरही टीका केली. जरांगे म्हणाले की, ते म्हणतात ७ कोटी खर्च आला, पण कोटीच पहिल्यांदा ऐकले आम्ही. काय म्हणावे एवढ्या मोठ्या नेत्याला कळाले पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार हा तुमच्या पक्षाचा नेता आहे, त्याला जरा समज द्या, नाहीतर मी असा मागे लागेल ना, माझ्या नादाला कुणी लागलं तर मी सोडतच नाही, असेही जरांगे म्हणाले.

मी घाबरत नाही – भुजबळ
तू जिवंत राहणार नाहीस, तुझी वाट लावू, अशी धमकी देणारे फोन अनेक वेळा येत आहेत. शिव्याही दिल्या जात आहेत, पण मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही. मनोज जरांगे-पाटील यांचे मी काय खाल्ले आहे हे त्यांनी सांगावे. आता मनोज जरांगे-पाटील कुणाचे खाताय हे त्यांनी सांगावे. शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाजकार्यात आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठे केले, असे सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठे हे शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केले. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत मी काम केले आहे. यात माझेदेखील काहीतरी योगदान आहे. माझा माझ्या समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -