घरताज्या घडामोडीकरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार?

करोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार?

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी १० वाजता विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे.

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या पाचवर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. दरम्यान, करोनाचे सावट अधिवेशनावर देखील आहे. त्यासाठी सकाळी १० वाजता विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज किती दिवस चालू ठेवायचे यावर चर्चा केली जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, ११ वाजता कॅबीनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत करोनाच्या बाबतीत कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर चर्चा होणार आहे. सध्या राज्यात करोनाचे पाच रुग्ण आहेत. यासह आयपीएलबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वी राजेश टोपे यांनी आयपीएल स्पर्धेला होणारी गर्दी पाहून स्पर्धा रद्द करण्यासंदर्भात बीसीसीआयशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल, अशी भूमिका घेतली. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -