घरमहाराष्ट्रपैसे वसुलीसाठी महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

पैसे वसुलीसाठी महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

Subscribe

पैश्यांची वसुली करण्यास गेले असताना सहाजणांनी महिलेकडून शरीरी सुखाची मागणी केली.

आपल्या देशात महिलांबरोबर घडत असलेल्या घटनांची संख्या ही वाढत चाललेली आहे. वृत्तपत्रात किंवा वृत्तवाहिन्यांवर दरदिवशी महिलांसोबत बलात्कार, हत्या किंवा अत्याचार झाल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. त्यामुळे महिलेंच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा देशभरात निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये देखील एका महिलेसह अशीच एक घटना घडली आहे. नाशिकमध्ये असलेल्या वनविहार कॉलनी येथील कृषीधारा अॅग्रो कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेसोबत ही घटना घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सहा लोक कृषीधारा अॅग्रो कंपनीच्या कार्यालयात बळजबरीने घुसले. पैसे वसुली करण्यास हे सहाजण आले होते, मात्र त्यांनी महिलेचा छळ करत तिच्याकडून शरीरसुखाची मागणी केली.

नेमक काय घडले?

ही महिला एकटी असून त्या ठिकाणी ६ पुरुष होते. या सगळ्या प्रकरणाची तक्रार पीडितेने गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये केली. काशीनाथ शिंदे, भगीरथ म्हसणे, रामचंद्र गुंजाळ, संपत वाजे, खुशाल चव्हाण, रविंद्र गव्हाणे या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सहाजण बळजबरी कृषीधारा अॅग्रो कंपनीच्या कार्यालयात घुसले. तिथे असलेल्या महिलेसह लजास्पद असे कृत्य केले. ‘तू आमचे पैसे देऊन टाक’ असे म्हणत सहाजणांनी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर सर्वांनी महिलेला शिवीगाळ आणि दमदाटी करत पैशांची मागणी केली. आता या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बैसाने करत आहेत. कार्यालयात देखील अशा घटना घडत आहे तर आता महिला या कुठेही सुरक्षित नाही का? असा फार महत्तवाचा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा: शेतकऱ्यांची २ लाखापर्यंतचे कर्जमाफ; उद्धव ठाकरेंची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -