घरमहाराष्ट्रदलित अत्याचारावर युवा पँथर आक्रमक; गृहमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न

दलित अत्याचारावर युवा पँथर आक्रमक; गृहमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न

Subscribe

राज्यात दलितांवरील अन्यायाविरुद्ध पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप करत दलित युवा पॅंथरने आज गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. दलित युवा पॅंथरचा कार्यकर्ता असलेल्या अतिश बनसोडे या तरुणाने मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तात हा प्रकार घडला.

अनिश बनसोडे हा तरुण अन्य कार्यकर्त्यांसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचला. त्याच्या हातात निवेदन होतं. मंत्र्यांचा ताफा दाखल होताच हा तरुण ताफ्यासमोर येत दलितांवरील अन्याय दूर झालेच पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. राज्यात दलितांवरील अन्यायाविरुद्ध पोलीस काहीच कारवाई करत नाहीत, असं म्हणत दलित युवा पॅंथरच्या दोन कार्यकर्त्यांनी हे निषेध आंदोलन केलं. गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा ताफा अडवून तरुणांनी निवेदनाच्या प्रती भिरकावल्या. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -