घरताज्या घडामोडीमहाजॉब्स योजनेवरुन महाविकासआघाडीत बिघाडी, युवक काँग्रेसच्या अध्यक्षांची नाराजी

महाजॉब्स योजनेवरुन महाविकासआघाडीत बिघाडी, युवक काँग्रेसच्या अध्यक्षांची नाराजी

Subscribe

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. मात्र आता या महाजॉब्स योजनेवरुन महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे. या महाजॉब्स योजनेवरुन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नाराजी व्यक्त केली असून, ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणालेत सत्यजित तांबे?

सत्यजित तांबे यांनी टि्वट करून नाराजी व्यक्त केली असून, महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच आघाडीचे गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पडल्याचे तांबे यावेळी म्हणालेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -