घरक्राइमबोईसरमधील तरुण एनआयएच्या ताब्यात; दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय

बोईसरमधील तरुण एनआयएच्या ताब्यात; दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय

Subscribe

बोईसर विदेशातील आतंकवादी संघटनांबरोबर संपर्क असल्याच्या संशयातून एनआयएच्या पथकाने बोईसरमधील एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हमराज शेख असे त्याचे नाव आहे.

बोईसर विदेशातील आतंकवादी संघटनांबरोबर संपर्क असल्याच्या संशयातून एनआयएच्या पथकाने बोईसरमधील एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हमराज शेख असे त्याचे नाव आहे. तसेच, एनआयएने कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. आयएसआयएसच्या संशयित दहशतवाद्याचे नाव आरिफ असल्याचे सांगण्यात येत आहे. (Youth in Boisar in NIA custody Suspected of being in contact with a terrorist organization)

राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने आयएसआय आणि अल कायदा या जागतिक आतंकवादी संघटनेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून आज बंगळूरू आणि मुंबई येथे धाडसत्र सुरू केले आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील हमराज शेख (वय २४) वर्षे या उच्चशिक्षीत तरुणाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

शनिवारी सकाळी ८.३० च्या दरम्यान बोईसर अवधनगर येथील वडिलांच्या चप्पल दुकानातून हमराज ला एनआयए च्या अधिकार्‍यानी ताब्यात घेऊन बोईसर पोलिस स्टेशन येथे आणले. हमराज राहत असलेल्या सोमनाथ पॅराडाईज येथील घराची देखील पोलिसांनी तपासणी केली. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत बोईसर पोलिस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू होती. त्याच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला असून त्याला अधिक चौकशीसाठी मुंबई येथे नेण्यात आल्याची माहीती मिळत आहे.

हमराज शेख चे कुटुंब हे ३० वर्षापासून बोईसर येथे राहत असून त्याच्या वडीलांचे अवधनगर येथे चप्पलांचे दुकान आहे. हमराजचे माध्यमिक शिक्षण चिन्मय स्कूल येथे तर १० वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण टीव्हीएम स्कूल बोईसर येथे झाले आहे. त्याने रुस्तमजी स्कूल डहाणू येथून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली असून शिक्षणानंतर तो केरळ आणि सौदी अरेबिया येथे ३ वर्षे नोकरीसाठी गेला होता.

- Advertisement -

मागील नोव्हेंबर महीन्यातच तो भारतात परतून वडीलांना दुकानांत मदत करीत होता. नोकरीनिमित केरळ आणि सौदी अरेबिया येथे गेल्यानंतरच हमराज चा आतंकवादी संघटनांसोबत संपर्क झाल्याचा एनआयए ला संशय असून याबाबत त्याच्या कुटुंबाला काहीच माहीती नसल्याचे त्याच्या वडीलांनी सांगितले आहे.

एका संशयित दहशतवाद्याला अटक

एनआयएने कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. आयएसआयएसच्या संशयित दहशतवाद्याचे नाव आरिफ असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आणि एजन्सीने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

बेंगळुरूमध्ये ही एनआयएने संशयित IS दहशतवाद्याला अटक केली. आरोपी सीरियाला जाण्याचा विचार करत होता.  नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) शनिवारी मुंबई आणि बेंगळुरूमध्ये काही संशयितांचा दहशतवादी संघटना ISIS आणि अल-कायदाशी संबंध असलेल्या अनेक ठिकाणी शोध घेतला. या काळात संशयितांच्या ठिकाणाहून डिजिटल उपकरणे आणि गुन्ह्याची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते.


हेही वाचा – मुंबईतील चकाला येथे बेस्ट बसला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

बोईसरमधील तरुण एनआयएच्या ताब्यात; दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -