घरमहाराष्ट्रमहाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान तरुणाचा गोंधळ

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान तरुणाचा गोंधळ

Subscribe

भाजपच्या महाजानादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करत असताना भर सभेत एका तरुणाने गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या इसमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बॅनर देखील फडकवण्याचा प्रयत्न केला. आपल्या पगाराचे पैसे न मिळाल्याने त्याने हा रोष व्यक्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याने फडकवलेल्या बॅनरवर ‘भाजपचा बाजार सुरु आहे’, असे लिहले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची राज्यभरात महाजनादेश यात्रा निघाली आहे. आज अमरावतीच्या संत गाडगेबाबा यांच्या कर्मभूमीतून या यात्रेचा शुभारंभ झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -