घरताज्या घडामोडीइंधन दरवाढीविरोधात रविवारी युवासेनेची सायकल रॅली, जनतेच्या मनातील रोष केंद्राला दाखवणार

इंधन दरवाढीविरोधात रविवारी युवासेनेची सायकल रॅली, जनतेच्या मनातील रोष केंद्राला दाखवणार

Subscribe

केंद्रातील मोदी सरकारने २०१४ साली सत्तेत येण्यासाठी महागाईतून दिलासा देण्याचे आश्वासन दिलं होते. परंतु सत्तेत आल्यानंतर पहिल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात महागाई झाली आहे. २०१४ नंतर जनतेनं कधी न पाहिलेली महागाई आणि पेट्रोल डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. यामुळे जनतेच्या मनात किती रोष निर्माण झाला हे दाखवण्यासाठी युवासेना राज्यभर सायकल रॅली काढणार असल्याची घोषणा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे. तसेच राज्यातील सर्व युवासैनिकांना आणि युवकांना या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत राज्यातील युवकांना महागाईविरोधात युवासेनेच्या सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. सरदेसाई यांनी देशातील आणि राज्यातील वाढती महागाई आणि दिवसेंदिवस पेट्रेल डिझेलच्या दरात होणाऱ्या वाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये “बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार” असा नारा देत केंद्रात आपली सत्ता स्थापन केली परंतु त्यानंतर गेल्या ७ वर्षांमध्ये कधी न पाहिलेली महागाई आणि इंधन दरवाढ पाहिली असल्याचे सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

वरुण सरदेसाई राज्यातील युवकांना सायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी आवाहन करताना म्हणाले की, २०१४ साली बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार असा नारा देत भाजपने केंद्रात आपली सत्ता स्थापन केली पण गेल्या ७ वर्षामध्ये या देशाने कधी न बघितलेली इंधन दरवाढ होत गेली. आता तर दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल डिझेलचे दर शंभरीच्या पार गेले आहेत. दिवाळी तोंडावर असताना सामान्य जनता महागाईने होरपळून गेली आहे. म्हणून सामान्य जनतेच्या मानातील रोष तो केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी युवासेनेने रविवारी संपुर्ण राज्यभर इंधन दरवाढ विरोधात सायकल रॅलीचे आयोजन करण्याचे ठरवले असल्याचे सरदेसाई म्हणाले.

तसेच ही सायकल रॅली महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात होणार आहे. युवा सैनिकांना युवती सेनेच्या कार्यकर्त्यांनी व महाराष्ट्रातील सर्व युवकांनी देखील या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावे आणि केंद्र सरकारला जनतेच्या मनामध्ये इंधन दरवाढ, महागाईविरोधात किती रोष आहे हे कळवावे असे आवाहन वरुन सरदेसाई यांनी केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Deglur By Election: देगलूर पोटनिवडणूकीत ६०.९२ टक्के मतदान, दीड लाखांहून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -