घरमहाराष्ट्र'काय दारू, काय चकणा, ५० खोक्यातून बायकोला साडी घेऊन द्या'; शहाजी बापूंवर...

‘काय दारू, काय चकणा, ५० खोक्यातून बायकोला साडी घेऊन द्या’; शहाजी बापूंवर युवासेनेची टीका

Subscribe

ऑडिओ क्लिपमधील त्यांचा डायलॉगही चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे शहाजी बापूंवर टीका होताना नेहमीच त्यांच्या या डायलॉगची चर्चा होते.

सोलापूर – “काय हाटील, काय डोंगार, काय झाडी, सगळं एकदम ओक्के”, या डायलॉगबाजीमुळे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील एकदम प्रसिद्धी झोतात आले होते. त्यांचा हा डायलॉगही तुफान गाजला. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शहाजीबापूंना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. मात्र, त्यांच्या याच डायलॉगचा फॉरमॅट घेऊन त्यांच्यावरच शिवसेनेच्या युवासेनेने टीका केली आहे.

हेही वाचा – काय झाडी, काय डोंगरवरून उद्धव ठाकरेंचा शहाजी बापूंवर निशाणा

- Advertisement -

युवासेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख गणेश इंगोल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शहाजी बापू पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. “बापू मतदारसंघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा. काय दारु… काय चकणा.. काय ते ५० खोके समदं कसं ओके. बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल. आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करु, टक्केवारी घेऊन आधी स्वतःचं घर पूर्ण करा. स्वतःच्या बायकोला ५० खोक्यातून साडी घेऊन द्या”, अशी बोचरी टीका करण्यात आलीय.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून ५० आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठलं होतं. त्यावेळी शहाजी बापू पाटील यांना त्यांच्या एका कार्यकर्त्याने फोन करून गुवाहाटीविषयी चौकशी केली. तेव्हा काय डोंगार, काय झाडी, काय हाटेल, एकदम ओकेमदी हाय सगळं असं शहाजी बापू म्हणाले होते. त्यांचा हा ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाला. तसंच, ऑडिओ क्लिपमधील त्यांचा डायलॉगही चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे शहाजी बापूंवर टीका होताना नेहमीच त्यांच्या या डायलॉगची चर्चा होते.

- Advertisement -

हेही वाचा – कशाला ती स्टाईल, कटाळा आलाय— झाडी, डोंगर फेम शहाजी बापू वैतागले

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -