घरमुंबईमुंबईतील कोहिनूर रूग्णालयात एकाच दिवशी १० गरजू रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईतील कोहिनूर रूग्णालयात एकाच दिवशी १० गरजू रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Subscribe

मुंबईतील कोहिनूर रूग्णालयात चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम पार पडला. या अभिनव उपक्रमात एकाच दिवशी १० रूग्णांवर विभिन्न प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्यात. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च एचसीपी (HCP-ENT) या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने कानाचा पडदा फाटणे, कानाचे हाड खराब होणं, थायरॉईड यांच्यासारख्या शस्त्रक्रिया रूग्णांवर करण्यात आल्या आहेत. गरजू रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळावेत, या अनुषंगाने कोहिनूर रूग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. संजय हेलाले यांनी या वेगळ्या शस्त्रक्रिया केल्यात.

सामान्यतः लोक कान-नाक-घसा अशा आजारांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे कान फुटणे, कानातून पाणी गळणे, ऐकायला कमी येणं, चक्कर येणं ही लक्षणे रूग्णांमध्ये दिसतात. परंतु, अनेक लोक डॉक्टरांकडे जाण्यास टाळतात. वेळीच उपचार आणि निदान न झाल्यास कानाचं दुखणं वाढू शकतं. अशा वेळी शस्त्रक्रिया करण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. सर्वसामान्य गरजू रूग्णांना याचा खर्च परवडणारा नसतो, म्हणून या रूग्णालयाद्वारे हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमाद्वारे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

कोहिनूर रूग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. संजय हेलाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याचदा अनेक रूग्ण उपचारासाठी पैसे नसल्यानं रूग्णालयात येणं टाळतात. वेळीच उपचार न मिळाल्यानं आजार वाढू शकतो. म्हणूनच कानावरील शस्त्रक्रिया गरजू रूग्णांना कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी रूग्णालयानं काही वर्षांपूर्वी खास उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाद्वारे चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीनं रूग्णांवर परवडणाऱ्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत १० ते १५ वर्षांत साधारणतः एक हजारांहून अधिक रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.


प्राथमिक शिक्षणात स्वाध्याय पुस्तिकेवर भर; ऑनलाईनमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -