घररायगडप्राथमिक शिक्षणात स्वाध्याय पुस्तिकेवर भर; ऑनलाईनमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा

प्राथमिक शिक्षणात स्वाध्याय पुस्तिकेवर भर; ऑनलाईनमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा

Subscribe

कोरोना संसर्गात गेल्या वर्षापसून बंद असलेल्या प्राथमिक शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्षात देखील सुरू झाल्या नसून पहिली ते चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे.

कोरोना संसर्गात गेल्या वर्षापसून बंद असलेल्या प्राथमिक शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्षात देखील सुरू झाल्या नसून पहिली ते चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. यावर उपाय म्हणून यंदापासून स्वाध्याय पुस्तिकेवर अधिक भर दिला जाणार आहे. कोरोना विषाणूने शिक्षणपद्धतीत बदल झाला असून विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देण्याची वेळी आली आहे. ऑनलाईन शिक्षण माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जात असून त्यात प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती देखील वेगळी नाही.

खालापूर तालुक्यात अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण घेण्याची सुविधा नसल्याने शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्राथमिक शाळा शिकणारे दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी कौटुंबिक हलाखीची परिस्थिती यामुळे मोबाईलपासून दूर आहेत. परिणामी शिक्षणापासून दूर आहेत. पास करण्याच्या धोरणामुळे हे विद्यार्थी पुढे गेले असले तरी प्राथमिक शिक्षणाचा पाया कच्चा राहिल्याचे पालक आणि शिक्षक देखील मान्य करत आहेत.

- Advertisement -

ग्रामीण भागातील विशेषता दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. याकरता शिक्षक अशा ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते. या शैक्षणिक वर्षात स्वाध्याय पुस्तिकाद्वारे विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जाणार असून तो ऑनलाइन न तपासता शिक्षक स्वतः शाळेच्या ठिकाणी जाऊन तपासणार आहेत.
– भाऊसाहेब पोळ, प्रभारी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, खालापूर

विद्यार्थ्यांनी शाळेत पाय न ठेवता पुढची इयत्ता गाठली असली तरी पाटी कोरी राहिली आहे. मुळाक्षरे, बेरीज वजाबाकी याची तोंड ओळख न झालेले शेकडो विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यांचा पाया कच्चा राहू नये. यादृष्टीने विद्यार्थ्यांना पंचायत दिवसाचा ब्रिज कोर्स आणि नव्या शैक्षणिक वर्षात स्वाध्याय पुस्तिका देण्यात येणार आहे. शिवाय ४५ दिवसाचा कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना कठीण विषयावर भर दिला जाणार आहे. शिवाय स्वाध्याय पुस्तिका शिक्षक दर आठवड्याला तपासणी करणार असून विद्यार्थ्यांनी शिक्षक यांची भेट होत राहणार आहे.

- Advertisement -

गेली चार वर्षे प्राथमिक शिक्षणातील महत्त्वाची स्वाध्याय पुस्तिका गायब झाल्यासारखी परिस्थिती होती सर्व विषयाच्या स्वाध्याय पुस्तिका मिळत नसल्याने शिक्षणात खंड पडत होता यंदा मात्र शिक्षण विभागाकडून स्वाध्याय पुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

हेही वाचा –

‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला पुन्हा ह्रदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -