घरमुंबईराऊतांच्या निकटवर्तीयांकडून तब्बल १०० कोटींचा घोटाळा

राऊतांच्या निकटवर्तीयांकडून तब्बल १०० कोटींचा घोटाळा

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांनी रेमडेसिवीरचा काळा बाजार करीत महापालिकेत तब्बल १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सुजित पाटकर यांनी मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) जे पार्टनरशिप डिड दिले तसेच त्यांच्याबरोबर जो वेगळा जुलै २०२१ मध्ये करार केला व अन्य २१ टेंडर अ‍ॅप्लिकेशन केले त्या सगळ्यांमध्ये ही पार्टनरशिप डिड रजिस्टर आहे, असे म्हटले आहे, परंतु ३० डिसेंबर २०२१ रोजी निबंधक भागीदारी संस्था, महाराष्ट्र सरकारने लिखित कळवले की, सुजित पाटकर यांची लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी ही रजिस्टर कंपनी नाही, नोंदणीकृत नाही.

- Advertisement -

महाराष्ट्रात नोंदणीकृत नसलेल्या कोणत्याही भागीदारी फर्म यांच्याशी कुठल्याही सरकारी संस्थेला करार करता येत नाही. त्यांना कोणतेही टेंडर देता येत नाही. तरी आपल्या निकटवर्तीयांच्या फायद्यासाठी तत्कालीन सत्ताधार्‍यांकडून हा घाट घालण्यात आला. मुंबई महापालिकेचे अधिकारी सुनील धामणे यांचाही या गैरव्यवहारात समावेश असून त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे सोमय्या म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -