घरताज्या घडामोडी11 july History: लोकलच्या ७ साखळी स्फोटांनी हादरली होती मुंबई

11 july History: लोकलच्या ७ साखळी स्फोटांनी हादरली होती मुंबई

Subscribe

पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड, माहिम जंक्शन, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी,भाईंदर आणि बोरिवली या स्थानकात हे भीषण स्फोट घडवण्यात आले.

मुंबईत राहणारी प्रत्येक व्यक्ती आजचा दिवस विसरु शकत नाही. ११ जुलै २००६ मुंबईची लाईफ असलेल्या मुंबईच्या लोकलमध्ये एकापाठोपाठ एक अशा ७ साळखी बॉम्ब स्फोटांनी मुंबई हादरुन गेली होती. (11 July History: Mumbai 7 local chain blasts) वेगवेगळ्या स्थानकात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या ७ साखळी बॉम्ब स्फोटात २०९ लोक ठार झाले होते. तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते. ११ जुलै हा दिवस मुंबईकरांच्या आयुष्यात काळा दिवस ठरला होता. प्रत्येक जण स्वत: चा जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. मुंबईची लाईफ लाईन असलेल्या मुंबई लोकलने दररोज हजारो प्रवासी करतात. मात्र ११ जुलै २००६ रोजी झालेल्या ७ साळखी बॉम्ब स्फोट प्रत्येकाला चिंतेत टाकणारे आणि अस्वस्थ करणारे होते. अवघ्या ११ मिनिटात सात ठिकाणी झालेल्या स्फोटांनी मुंबईला पूर्ते हादरवून टाकले.

- Advertisement -

मुंबईत सर्वसामन्यांचा प्रमुख वाहतूक मार्ग असलेल्या लोकलवर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी चर्चगेटहून निघणाऱ्या गाड्यांना आपले लक्ष केले. मुंबईच्या पश्चिम मार्गावरील लोकलच्या फर्स्ट क्लॉसच्या डब्ब्यांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले. संध्याकाळी ६वाजून २४ मिनिटांनी मुंबईच्या रेल्वे स्थानकात पहिला स्फोट झाला आणि ६ वाजून ३५ मिनिटांनी शेवटचा स्फोट झाला. अवघ्या ११ मिनिटात मुंबईतील महत्त्वाची ७ रेल्वे स्थानके स्फोटात होरपळून निघाली. पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड, माहिम जंक्शन, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी,भाईंदर आणि बोरिवली या स्थानकात हे भीषण स्फोट घडवण्यात आले.

- Advertisement -

या स्फोटात ठार झालेले बहुतेक लोक हे माहिम जंक्शनहून चर्चगेट बोरिवली लोकलमधून प्रवास करत होते. मीरा रोड भाईंदर लोकलमध्ये असणाऱ्या ३१ लोकांनी या स्फोटात आपला जीव गमावला. तर माटुंगा रोड – माहिम जंक्शन दरम्यान चर्चगेट बोरिवली लोकलमध्ये एकूण २८ जण ठार झाले. तर चर्चगेट बोरिवली लोकलमध्ये २८, चर्चगेट विरार लोकलमधील २६ लोकांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे चर्चेगेट बोरिवली लोकलमध्ये वांद्रे-खार रोड स्थानकात २२ प्रवासी आणि चर्चगेट लोकमध्ये एकूण ९ लोकांचा मृत्यू झाला.

मुंबईतील झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटाची पूर्व कल्पना असल्याचे तत्कालीन गृहमंत्री शिवराज पटील यांनी म्हटले होते. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर त्यावेळीच्या सरकारचा कडाडून विरोध झाला होता. मुंबईत साखळी बॉम्ब स्फोट होण्याआधी श्री नगरमध्ये देखील ग्रेनेड हल्ला झाला होता. मात्र तत्कालीन गृहसचिवांनी या दोन्ही हल्ल्यांचा परस्परांशी संबंध असल्याचे नकारले होते.


हेही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये दोन पोलिसांसह ११ कर्मचारी निलंबित; दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याने कारवाई

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -