घरCORONA UPDATEधारावीत दोन दिवसांमध्ये १२७ कोरोनाचे रुग्ण!

धारावीत दोन दिवसांमध्ये १२७ कोरोनाचे रुग्ण!

Subscribe

धारावीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून मे महिन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये १२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यापैकी १ मे रोजी ३८ तर २ मे रोजी ८९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत धारावीतील एकूण रुग्ण संख्या पाचशेच्या घरात जाऊन पोहोचली आहे. यामध्ये १८ रुग्णांच्या मृत्यूचा देखील सामावेश आहे. १ व २ मे रोजी आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कुंभारवाडा(१६ रुग्ण), कुंचिकुरवे नगर (७ रुग्ण), मुकुंद नगर (८ रुग्ण), सुभाष नगर (८ रुग्ण), धारावी क्रॉस रोड (४ रुग्ण), सोशल नगर (४ रुग्ण), कमला नगर (३ रुग्ण), राजीव गांधी नगर(६ रुग्ण), इंदिरा नगर (३ रुग्ण), आंबेडकर चाळ (३ रुग्ण) तर मुस्लिम नगर, संत रोहिदास मार्ग, म्युनिसिपल चाळ, धारावी मेन रोड, कल्याणवाडी, पीएमजीपी कॉलनी, सिध्दीविनायक को-ऑ.सोसायटी, जस्मिन मिल रोड, शास्त्री नगर, आगासवाडी, शिव शक्ती नगर, ९०फुटी रस्ता, चमडाबाजार आदी ठिकाणी प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत.

याशिवाय माटुंगा लेबर कॅम्प, एकेजी नगर, बालाजी नगर, जयभवानी बिल्डींग, हनुमान चाळ, धोरवाडा, राजीव गांधी नगर, लक्ष्मी चाळ, टि.जंक्शन, एस.एम. रोड, इंदिरा कुरेशी नगर, आझाद नगर, काळा किल्ला, साईबाबा चाळ, नेहरु नगर, शाहू नगर, अबू बकर चाळ, गांधी सोसायटी, समृद्ध दर्शन सोसायटी, गंगाधर चाळ, पिवळा बंगला, नवाब नगर, मुस्लिम नगर, ढोर वाडा, टाटा हौ.सो. ट्रान्सिट कॅम्प, संकल्प सोसायटी, महाराणा प्रताप सो., सनाऊल्ला कंपाऊंड आदी ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

- Advertisement -

माहिम-दादरमध्ये ३० रुग्णांची भर

माहिम भागामध्ये मागील दोन दिवसांमध्ये १७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये माहिम कॉजवेला ४ रुग्ण तर पितांबर लेनला २, शितलादेवी मंदिर १, शितला देवी रोडवर १ यासह मच्छिमार कॉलनी, बीएलएस रोड, पेन्शनर्स चाळ, जनता सेवक सोसायटी, कोळी नगर, गुरुदत्ता कोळी समाज, एल.जे .रोड तसेच बालामिया रोड येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे माहिममधील कोरोना रुग्णांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. तर दादरमधील कोरोनाग्रस्तांची संख्या ४६ वर पोहोचली आहे. मागील दोन दिवसांमध्ये या विभागात १३ नवेन रुग्ण आढळून आले आहेत. काशिनाथ धुरु रोडवर २ तर फाळके रोडवरील २ रुग्णांसह अननदुलगानी चाळ, पदमाबाई चाळ, सयानी रोड, गोखले रोड, गौतम नगर, शिवाजीपार्क, जयहिंद सोसायटी, केळुसकर रोड, विजय नगर आदी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -