घरमुंबईठाणे जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार मिमी पावसाची नोंद

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार मिमी पावसाची नोंद

Subscribe

गेल्या वर्षीपेक्षा १ हजार मिलिमीटर अधिक पाऊस पडला आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात तब्बल ६२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल १५ हजार मिलिमीटपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. गेल्या वर्षीपेक्षा १ हजार मिलिमीटर अधिक पाऊस पडला आहे. गेल्या आठवडाभरापासूनप ठाणे जिल्हयात पावसाने रौद्ररूप धारण केले. कल्याण डोंबिवलीसह बदलापूर परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली हेाती. बारवी धरण भातसा धरण ओव्हर फ्लो झाले. मुसळधार पावसामुळे शेकडो नागरिकांंच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. धरणांप्रमाणेच शहरी आणि ग्रामीण भागातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण मुरबाड उल्हासनगर अंबरनाथ भिवंडी शहापूर परिसरात मुसळधार पाऊस पडला. कल्याण आणि मुरबाड तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे.

आतापर्यंत पावसाची नोंद

ठाणे : २३३३ मिमी
कल्याण : २१६४ मिमी
मुरबाड : १८०३ मिमी
उल्हासनगर : २३५६ मिमी
अंबरनाथ : २०२८ मिमी
भिवंडी : २४६७ मिमी
शहापूर : २००० मिमी

- Advertisement -

हेही वाचा – एकनाथ शिंदेच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी भाजपचे ‘गणेशास्त्र’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -