घरमुंबई1857 च्या स्वातंत्र्य संग्रामातील शहिदांचे स्मारक वाऱ्यावर; गर्दुल्ले अन् भटक्या कुत्र्यांचा ताबा

1857 च्या स्वातंत्र्य संग्रामातील शहिदांचे स्मारक वाऱ्यावर; गर्दुल्ले अन् भटक्या कुत्र्यांचा ताबा

Subscribe

मुंबई : भारतावर गुलामी लादणाऱ्या इंग्रजांविरोधात उठाव करणाऱ्या व 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या मंगल गडिया व सय्यद हुसेन या दोघांचे मुंबई महापालिका मुख्यालयासमोर अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेले स्मारक महापालिकेत सत्ताधारी, महापौर वगैरे कोणीही नसल्याने अगदी वाऱ्यावर सोडून दिले आहे. सध्या मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे झाकोळलेल्या या स्मारकाच्या ठिकाणी गर्दुल्ले, मद्यपी दिवस-रात्र व्यसन करतात व झोपा काढतात. तर भटकी कुत्री त्याच पवित्र समाजाच्या जागेत मूत्र व विष्ठा विसर्जन करून मोकळे होत आहेत. (1857 Independence War Martyrs Memorial Winds Possession of stray and stray dogs)

भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी हे याच महापालिकेत नगरसेवक व गटनेता म्हणून काम करीत असताना त्या काळात विकासकामे, नागरिकांची कामे न झाल्यास ‘या मुंबईला कोणी वाली नाही’ अशा शब्दांत आपला संताप व्यक्त करीत असत. आता सदर ‘शहिदांच्या स्मारकाला कोणी वाली नाही’ नाही असेच म्हणावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – त्या 850 रिंग रूट बाधितांच्या पुनर्वसनापूर्वीच पालकमंत्र्यांचा सत्कार समारंभ?

1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणारे मंगल गडिया व सय्यद हुसेन या दोघांचे स्मारक मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर उभारण्यात आले. या दोन्ही शहिदांच्या बलिदानाचे चिरंतन स्मरण व्हावे आणि त्यामधून देशाच्या भावी पिढीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सदर स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे लोकार्पण 21 ऑगस्ट 2009 रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि मुंबईच्या महापौर शुभा राऊळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्यानंतर या स्मारकाची काही काळ थोडीफार चांगली देखभाल करण्यात आली. मात्र जेव्हापासून मेट्रो रेल्वेचे काम सुरू झाले तेव्हापासून सदर स्मारक परिसर झाकोळला गेला.

- Advertisement -

तसेच, या स्मारकाच्या ठिकाणी कोणीही सुरक्षारक्षक नसल्याने व पालिकेनेही जवळजवळ दुर्लक्ष केल्याने, स्मारक वाऱ्यावर सोडल्याने गर्दुल्ले, मद्यपी यांनी या स्मारकाचा ताबा घेतला आहे. या स्मारकाच्या ठिकाणी मद्याच्या बाटल्या टाकून दिल्याचे, काही गर्दुल्ले व्यसन करताना आढळून येत आहेत. तर आझाद मैदानात आंदोलनाला येणारे, सीएसएमटी परिसरात फेरीवाला व्यवसाय करणारे, काही पर्यटक मंडळीही बिनधास्तपणे या स्मारकाच्या ठिकाणी चप्पल, बूट घालून मिरवतात आणि झोपा काढताना आढळून येतात. तसेच, फेरीवाले त्यांचे बाकडे या ठिकाणी ठेवतात. कचरा आढळून येतो. या जागेत स्वच्छता आढळून येत नाही.

हेही वाचा – Unseasonal Rain : विदर्भात अवकाळीचा कहर; कापसाच्या झाल्या वाती, तूर करणार ‘चिंतातूर’

भटक्या कुत्र्यांकडूनही मूत्र व विष्ठा विसर्जन

सदर पवित्र स्मरकाचे पावित्र्य जपणे मुंबई महापालिकेचे कर्तव्य आहे. मात्र या स्मारकाला वाऱ्यावर सोडून दिले गेल्याने तेथे गर्दुल्ले, मद्यपी यांच्या सोबतच भटक्या कुत्र्यांनीही या जागेला आपला “अड्डा”च बनविल्याचे निदर्शनास येते. सदर परिसरतील भटकी कुत्री या स्मारकाच्या जागेत नियमितपणे वावरताना आढळून येतात. ही कुत्री याच ठिकाणी विश्रांती करतात, माती उकरतात आणि याच ठिकाणी मूत्र व विष्ठा विसर्जित करून घाण करतात. त्यामुळे या स्मारकाचे पावित्र्य नष्ट होत आहे.

लोखंडी ग्रीलची तोडफोड व चोरी

या स्मारकाच्या सभोवती संरक्षणासाठी लोखंडी ग्रील लावण्यात आले आहेत. मात्र त्याची तोडफोड करून ते कापून गर्दुल्ले, मद्यपी, भुरटे चोर करीत आहेत. सध्या या ठिकाणी लोखंडी ग्रीलचा मोठा भाग तोडण्यात आला असून तो लटकत आहे, शेवटच्या घटका मोजत आहे. त्या लोखंडी तुकड्याची कोणत्याही क्षणी चोरी होण्याची शक्यता आहे.

हुतात्म्यांचा इतिहास

भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद भगत सिंग, मंगल पांडे, आदी अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिश राजवटी विरोधात बंडाचा झेंडा फडकविणारे मंगल गडिया व सय्यद हुसेन या दोघांना ब्रिटिश सरकारने मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानात तोफेच्या तोंडी दिले. या दोन्ही शहिदांना मानवंदना द्यावी व त्यांच्याकडून भारतीयांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने 2009 मध्ये तत्कालीन खासदार भारत कुमार राऊत यांच्या खासदार निधीमधून पालिका मुख्यालयासमोरील जागेत भारतीय स्वातंत्र्य संग्राम स्मृती स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाचे लोकार्पण 21 ऑगस्ट 2009 रोजी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तत्कालीन महापौर शुभा राऊळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -