घरताज्या घडामोडीधक्कादायक! लोकलच्या गर्दीने २२ वर्षीय तरुणाचा घेतला बळी

धक्कादायक! लोकलच्या गर्दीने २२ वर्षीय तरुणाचा घेतला बळी

Subscribe

मुंबईची लोकलची गर्दी २२ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतली आहे. धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली असून याबाबत बोरीवली रेल्वे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, लोकल चर्चगेटच्या दिशेने जात होती. यावेळी लोकलमध्ये खूप गर्दी होती. रतन विश्वाकर्मा नावाचा २२ वर्षीय तरुण दररोज नालासोपारा ते अंधेरी दरम्यान करायचा. नेहमीप्रमाणे तो ऑफिसमधून निघाला आणि नालासोपारा स्थानकातून त्याने लोकल पकडली. यादरम्यान लोकलमधील गर्दीत तो दरवाजात लटकत प्रवास करत होता. यावेळी गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान पोलची धडक झाली आणि तो ट्रॅकच्या बाजूला पडला. यानंतर लोकलमध्ये एकच गोंधळ उडाला होता. मग प्रवाशांनी आरडा-ओरडा करत लोकल थांबवून तरुणाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

लोकलमधील प्रवाशांनी घटनास्थळी जीआरपीला बोलावले. मग तरुणाला तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर जीआरपीने एडीआर म्हणजेच अॅक्सिटंडल टेथ असा एफआयआर दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती बोरीवली रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोविड ‘मुंबई मॉडेल’ने भारावले अखिल भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -