घरमुंबईमुंबईत व्यायाम करताना तरुणाचे ब्रेन हॅमरेज झाले

मुंबईत व्यायाम करताना तरुणाचे ब्रेन हॅमरेज झाले

Subscribe

मुंबईमध्ये जीममध्ये व्यायाम करत असताना एका तरुणाला कार्डियक अरेस्ट आला आहे. मुंबई सेंट्रल येथील मसल अॅण्ड माइंड या जीममध्ये ही घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जीममध्ये व्यायाम करत असाल तर थोडे सावधान रहा. कारण मुंबईमध्ये जीममध्ये व्यायाम करत असताना एका तरुणाला कार्डियक अरेस्ट आला आहे. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात ही घटना घडली आहे. या तरुणाची प्रकृती सध्या गंभीर असून त्याच्यावर भेंडी बाजार येथील साबो सिद्दिकी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

व्यायाम करताना अचानक तो खाली कोसळला

२२ वर्षाचा अदनान मेनन ७ जुलैला मुंबई सेंट्रल येथील मसल अॅण्ड माइंड या जीममध्ये व्यायाम करत होता. त्याचे जीम ट्रेनर त्याच्याकडून वेट्स लिफ्टिंगचा वर्कआऊट करुन घेत होते. मात्र तीन ते चार वेळा वेट्स लिफ्टिंग केल्यानंतर अदनानला कार्डियक अरेस्ट आला आणि तो खाली कोसळला. जीममधील ट्रेनर आणि सर्व तरुणांनी त्याला ताबडतोब साबो सिद्दीकी रुग्णालयात दाखल केले. ही संपूर्ण घटना या जीममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फूटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

व्यायाम करताना थोडी काळजी घ्या

अदनान मेननची हृदयक्रिया बंद पडल्यामुळे त्याचे ब्रेन हॅमरेज झाले असल्याचे साबो सिद्दिकी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. अदनानची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. हल्ली तरुणांमध्ये फीट राहण्यासाठी जीममध्ये जाण्याची क्रेझ खूप वाढली आहे. लवकरात लवकर बॉडी बनवण्याच्या नादात बरेत तरुण जास्त वेळ वर्कआऊट करतात. मात्र अशावेळी त्यांनी तब्बेतीची थोडी काळजी घ्यावी.

Youth suffer from Cardiac Arrest during workout in Gym

व्यायाम करताना तरुणाला आला कार्डियक अरेस्टजर तुम्ही जीम करत असाल तर थोडे सावधान रहा. कारण जीम करत असताना एका २२ वर्षीय तरुणाला कार्डियक अरेस्ट आला आहे. मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात ही घटना घडली. सध्या या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Posted by My Mahanagar on Sunday, 22 July 2018

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -