घरमनोरंजनजेव्हा ग्लॅमरस 'कतरिना' अशी दिसते

जेव्हा ग्लॅमरस ‘कतरिना’ अशी दिसते

Subscribe

बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री 'कतरिना कैफ'चा हा हटके लूक गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावरच्या कॅटच्या या अवताराची चर्चा आहे.

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती रोमान्स किंग शाहरुख खानच्या ‘झिरो’ या आगामी चित्रपटाची. ‘झिरो’मध्ये शाहरुख एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार असल्यामुळे, या चित्रपटाची अधिकच चर्चा आहे. मध्यंतरी रिलीज झालेल्या झिरोच्या पोस्टर्स आणि टीझरला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळाली होती. त्यानंतर याच चित्रपटातील आलेल्या सलमान खान आणि शाहरुख खान एकत्र असलेल्या गाण्याचा टिझर रिलीज झाला. दोघांच्या चाहत्यांची त्यालाही उत्स्फुर्त दाद मिळाली. तरीही ‘झिरो’ मधील दोन मुख्य नायिका अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांचा लूक गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता. मात्र, अखेर चित्रपटातील कतरिनाचा हटके लूक समोर आला आहे. डोळ्यांखाली गडद काळ्या रेषा असलेल्या या लूकमध्ये कॅट एका खलनायिकेसारखी दिसत आहे. कॅटचा हा लूक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. सुरुवातीला कतरिनाचे चाहते तिचा हा लूक पाहून काहीसे चक्रावले असले, तरी आता या फोटोला त्यांची चांगलीच पसंती मिळते आहे. दरम्यान येत्या २१ डिसेंबरला झिरो चित्रपट रिलीज होणार आहे.

व्हिडीओ सौजन्य- Movie talkies.com

- Advertisement -

शाहरूख – सलमान पुन्हा एकत्र

सलमान खान आणि शाहरूख खान हे दोन्ही हिरो असे आहेत, ज्यांचे संपूर्ण जगामध्ये कोट्यावधी चाहते आहेत. मध्यंतरी आलेल्या दुराव्यानंतर हे दोघे परत स्क्रिनवर कधी दिसणार? याकडे सगळ्यांच लक्ष होतं. आता ही प्रतिक्षा संपली आहे. शाहरूख खानच्या बहुचर्चित ‘झिरो’मध्ये सलमान आणि शाहरूखच्या मैत्रीची ही केमिस्ट्री चाहत्यांना बघायला मिळणार आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित चित्रपटात बबुआ सिंग ही भूमिका साकारत असलेल्या शाहरूखबरोबर सलमान खान गाण्यामध्ये थिरकताना दिसत आहे. या दोन पठाण हिरोंच्या केमिस्ट्रीनं इंटरनेटवर धुमाकूळ माजवला आहे, याबद्दल नक्कीच दुमत नाही.

zero
सौजन्य- सोशल मीडिया
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -