घरमुंबईदेशात २५ कोटी स्मार्ट मीटरचा प्रकल्प

देशात २५ कोटी स्मार्ट मीटरचा प्रकल्प

Subscribe

शेतात, घरगुती ग्राहकांसाठीही तंत्रज्ञान

आतापर्यंत केवळ औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांना मर्यादित असणारे स्मार्ट मीटर हे आगामी काळात घरगुती ग्राहकांपासून ते शेतकर्‍यांनाही उपलब्ध होणार आहेत. देशभरात २५ कोटी स्मार्ट मीटर लावण्याचे उदिष्ट एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हीसेस लिमिटेडने ठेवले आहे. देशातील विविध वीज वितरण कंपन्यांसोबत सध्या ईईएसएलने र्चा सुरू केली आहे. वाणिज्यिक आणि तांत्रिक हानी कमी करूनच हा तोटा भरण्यात येणार आहे.

आतापर्यंत देशात १ कोटी स्मार्ट मीटर ईईएसएलकडून बसवण्यात आले आहेत. नवी दिल्ली, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, राजस्थान यासारख्या राज्यात हे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. त्यापैकी ७ लाख मीटर हे कार्यरत आहेत. सरासरी २०० रूपयांची बचत या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अपेक्षित आहे. देशात २५ कोटी स्मार्ट मीटर बसवण्यात आले तर देशातील वीज ग्राहकांचे ६० हजार कोटी रूपयांची बचत होऊ शकते. वीज कंपन्यांना सध्या ईईएसएलकडून स्मार्ट मीटरचे तंत्रज्ञान अंमलात आणण्यासाठीची बोलणी सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्याचाही समावेश आहे. ईईएसएलकडून वीज कंपन्यांना स्मार्ट मीटरचे तंत्रज्ञान मोफत देण्यात येणार आहे. त्यामध्ये स्मार्ट मीटर, जीपीएससाठी सीम कार्ड, आयटी इन्फ्रा आणि जीपीआरएस तंत्रज्ञानाचा समावेश आहे. पण या तंत्रज्ञानाच्या मोबदल्यात वीज कंपनीने प्रत्येक मीटरमागे ८० रूपये ते ९० रूपये द्यावेत अशी मागणी ईईएसएलकडून करण्यात येणार आहे. तसेच ईईएसएल नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर फंडच्या माध्यमातूनही स्मार्ट मीटरचा प्रकल्प राबवण्यासाठी आर्थिक मदत घेण्याच्या तयारीत आहे.

- Advertisement -

शेतात, घरातही स्मार्ट मीटरदेशभरात काही राज्यात स्मार्ट मीटरचे तंत्रज्ञान हे वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी वापरण्यात येते. पण उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या राज्यात घरगुती आणि शेतातही स्मार्ट मीटर बसवण्याची सुरूवात झाली आहे. आता स्मार्ट मीटरचे दर कमी होत आहेत. त्यामुळेच स्मार्ट मीटरच्या किमतीही कमी होण्याची शक्यता आहे. एकाचवेळी ५० लाख स्मार्ट मीटर खरेदीची तयारी ईईएसएलने केली आहे. त्यामुळेच ८ हजार रूपयांवरून आता स्मार्ट मीटरची किंमत २५०० रूपयांवर आली आहे. शेतीसाठीच्या फीडरवर स्मार्ट मीटर बसवण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -