घरमुंबईमुंबईतील आयआयटी हॉस्टेलच्या २५ मुलींना विषबाधा

मुंबईतील आयआयटी हॉस्टेलच्या २५ मुलींना विषबाधा

Subscribe

आयआयटी मुलींच्या हॉस्टेलमधील २५ विद्यार्थींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आयआयटी मुंबईतील मुलींच्या हॉस्टेलमधील २५ विद्यार्थींना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या सर्व मुलींना गोड पदार्थांतून विषबाधा झाली आहे. अन्न विषबाधेने १० नंबर हॉस्टेलमधील २५ मुलींना आयआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार करुन प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना पुन्हा हॉस्टेलमध्ये सोडण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

गोड पदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा अंदाज

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई आयआयटी हे नावाजलेले आहे. आयआयटी मुंबईमध्ये जगभरातून विद्यार्थी येतात. शनिवारी या २५ विद्यार्थींनींना बनवलेल्या अन्नातून विषबाधा झाली होती. मात्र, आयआयटी हॉस्पिटलकडून हा दावा खोडून काढण्यात आला होता. पण, आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाला असून विषबाधेचे प्रकरण समोर आले आहे.

- Advertisement -

आयआयटी मुंबईकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एच १० या मुलींच्या हॉस्टेलमधील २५ मुलींना विषबाधा झाल्याचे कळले. जेवणात बनवलेल्या गोड पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. शिवाय, इथली मेस स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात आली असून पालिकेकडून या मेसची तपासणी केली गेली. त्यासोबतच अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठण्यात आले आहेत. विषबाधेचे कारण अहवालानंतर कळेल असेही आयआयटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


वाचा – पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विषबाधा, मग मुंबईकरांची काय तऱ्हा?

- Advertisement -

वाचा – भंडारा येथे ११५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -