घरमुंबई२६० उमेदवारांनी लाथाडली महापालिकेची नोकरी

२६० उमेदवारांनी लाथाडली महापालिकेची नोकरी

Subscribe

मुंबई महापालिकेतील कामगारांच्या रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून निवड झालेल्या उमेदवारांनी सेवा नाकारली आहे.

मुंबई महापालिकेतील कामगारांच्या १ हजार ३८८ रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून निवड झालेल्या २६० उमेदवारांनी कोणताही प्रतिसाद न देत महापालिकेची सेवाच नाकारली आहे. या उमेदवारांना स्मरण पत्र पाठवूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

या पदांसाठी निघाली होती भरती

मुंबई महापालिकेतील कामगार, कक्ष परिचर, श्रमिक, हमाल आया व स्मशान कामगार आदी चतुर्थ श्रेणीतील पदांसाठी १ हजार ३८८कामगारांची भरती सरळ सेवेद्वारे भरण्याचा निर्णय घेऊन ऑनलाईनद्वारे अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी एकूण २ लाख ८७ हजार ८८उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु यापैकी परिक्षेला २ लाख ४० हजार ४९५ उमेदवार बसले होते. पण यासर्व उमेदवारांमधून १ लाख ६ हजार १९३ उमेदवार हे उत्तीर्ण झाले होते. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ५० गुणांची आवश्यकता होती. त्यामुळे ५० गुण आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवून हे सर्व उमेदवार उत्तीर्ण झाले होते.

- Advertisement -

सरकारने दिली होती स्थगिती

या भरतीबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर याला सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर ही स्थगिती मागे घेतल्यानंतर याची पुढील प्रक्रिया महापालिकेने नियुक्त केलेल्या महाऑनलाईन या संस्थेस करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उत्तीर्ण उमेदवारांपैकी अधिक गुण उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची आरक्षण गटनिहाय लॉटरी काढून निवड करण्यात आली. याबाबतचे सर्व कागदपत्रे सादर करणार्‍या निवड झालेल्या उमेदवारांना सेवेत सामावून घेतले आहे. आतापर्यंत १ हजार ३८८ जागांसाठी निवड झालेल्यांपैकी १ हजार ११९ उमेदवारांनी सर्व प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना महापालिका सेवेत सामावून घेण्यात आले. तर २६० उमेदवारांकडून कोणताही प्रतिसाद लाभलेला नाही. तर उर्वरित ९ पैकी ६ उमेदवारांकडून कागदपत्राची तसेच प्रमाणपत्र छाननीचे पुरावे सादर केले जात आहेत. तर ३ उमेदवांकडून कागदपत्रे सादर करण्यास विलंब होत असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -